सौदी युवराजांच्या हौस पण खूपच भारी असतात बुवा! एवढे पैसे असतात की त्या पैशाने ते काहीही करू शकतात. आता हेच बघना अनेक युवराज हौस म्हणून येथे वाघ, सिंह पाळायचे. हा! आता सौदी सरकारने यावर बंदी घातली आहे ते या प्राण्याचे सुदैव. पण वाघ, सिंह यांसारखे प्राणी पाळण्याबरोबरच सौदीच्या युवराजांना आणखी एक वेड आहे ते म्हणजे बहिरी ससाणा पाळण्याचे. त्यामुळे अनेक सौदींच्या पाठीवर बहिरी ससाणा दिसेल. कदाचीत आपल्याला आश्चर्य वाटेल पण या ससाण्यांचे देखील पासपोर्ट आहेत. त्यामुळे युवराजांना या ससाण्यांना घेऊन बाहेरच्या देशात जायचे असेल तर हा पासपोर्ट सोबत बाळगणे आवश्यक आहे. काही सौदी राजकुमार तर विमानाची महागडी तिकिट काढून या पक्ष्यांना आपल्या सोबत नेतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : अबुधाबीच्या युवराजांचं आलिशान विमान!

त्यातूनच एक दोन नाही तर तब्बल ८० बहिरी ससाण्यांचा विमान प्रवासाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे सारे ससाणे सौदीच्या युवराजाच्या मालकीचे असल्याचे समजते दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे या ससाण्यांसोबत इतर सहप्रवासी देखील प्रवास करत आहेत. फ्लाय दुबईतल्या विमानातील हे दृश्य आहे. आपल्या ८० ससाण्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी युवराजांनी विमानातील ८० जागा आरक्षित केल्या होत्या. कदाचित आपल्यासारख्यांना हे दृश्य फार विचित्र वाटू शकेल. पण दुबईतल्या अनेक विमानांमध्ये ससाणे दिसणे ही सामान्य गोष्ट आहे. दुबईत अनेक युवराज आणि श्रीमंत माणसं आपल्या सोबत ससाणा बाळतात. ससाण्याचे खेळही येथे खूप प्रसिद्ध आहेत. या ससाण्याचे पासपोर्ट देखील आहेत. त्यामुळे या पक्ष्याचा मालक ससाण्याला घेऊन बहिरीन, कुवेत, पाकिस्तान, कतार, मोरोक्को, सिरिया यासांरख्या देशात प्रवास करू शकतात.

वाचा : प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यांच्या नावावर जगातील महागड्या लग्नसोहळ्याचा विक्रम