Viral Video: प्रेमाला, धाडसाला आणि जगण्याला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. हे सांगणारा एक भावुक आणि तितकाच सुंदर क्षण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एका नातीने आपल्या ८० वर्षांच्या आजीचा चक्क पॅरासेलिंग करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला तिने दिलेलं कॅप्शन नक्कीच आपल्याही डोळ्याच्या कडा अलगद ओल्या करून जातील.

तुम्ही व्हिडिओमध्ये बागही शकता की या आजीबाई चांगली टापटीप नऊवारी नेसून पॅरासेलिंग करायला समुद्र किनारी आल्या आहेत. साडीवरच पद्धतशीर सगळी दोऱ्या- तारांची जोडणी करून त्या उंच आकाशात झेप घेतात. आजींचा हा व्हिडीओ साधारण ७ वर्षांपूर्वी शूट केलेला असावा. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा एक एक भाव टिपण्यासारखा आहे. इंस्टाग्रामवर सेलिना मोझेस या तरुणीने हा व्हिडीओ शेअर करत सुंदर कॅप्शन दिले आहे.

सेलिना लिहिते की, “वय म्हणजे फक्त एक आकडा….आणि माझ्या आईला हे सिद्ध करायचं होतं….माझ्या आजीने ८० वर्षांची असताना हे केलं होतं….हा व्हिडिओ माझ्या गॅलरीत खूप दिवसांनी सापडला आणि मला शेअर करण्यापासून स्वतःला थांबवता आले नाही…ती आम्हाला ७ वर्षांपूर्वी सोडून गेली पण तिने मागे ज्या आठवणी सोडल्या आहेत त्या कायम स्मरणात राहतील…”

८० वर्षाच्या आजींचं नऊवारी नेसून पॅरासेलिंग

हे ही वाचा<< २६ सेकंदात ५० बुक्के, बूट घालून तोंडावर.. WWE स्टारला ‘ती’ने असा धुतला, Video बघून फॅन घाबरले

दरम्यान हा व्हिडीओ खरोखरच प्रेरणादायी आहे. अनेकदा कामाच्या रगाड्यात आयुष्य जगायचं राहून गेलं की मग सोशल मीडियावरील काही व्हिडीओ आपल्याला ताजेतवाने करू शकतात, त्यातीलच हा एक सुंदर क्षण! तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader