80 year Old Maths Question Paper: प्रत्येक देशाचे भवितव्य त्या देशातील शैक्षणिक संस्था आणि शिक्षणाच्या पद्धतीवर अवलंबून असते. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणे आवश्यक असते. पूर्वीच्या काळी विद्यार्थी गुरुच्या घरी जाऊन ज्ञान प्राप्त करत असत. पुढे मंदिरांमध्ये शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. त्यानंतर शाळा, विद्यालये अशा संकल्पना उदयास आल्या. ब्रिटीशांचे आगमन झाल्यानंतर आपल्या देशातील शिक्षण पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल झाला. सध्या शैक्षणिक संस्था या ब्रिटीशकालीन पद्धतीवर अवलंबून असल्याचे दिसून येते. पूर्वी लोकांना अभ्यासासाठी पुस्तके, ग्रंथ यांची मदत घ्यावी लागत असे. आता विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून डिजीटल पद्धतीने अभ्यास करु शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजकाल शिक्षण सोपे झाले असले तरी परीक्षा दिवसेनदिवस कठीण होत आहेत अशी तक्रार लोक करत असतात. काही दिवसांपूर्वी चॅटजीपीटीने देशातील काही स्पर्धात्मक परीक्षा दिल्या होत्या. या परीक्षांमध्ये पास होणे नव्या चॅटबॉटला शक्य झाले नाही. अशा परिस्थितीमध्ये काहीजण पूर्वीच्या परीक्षा सोप्या होत्या असे म्हणत असतात. लोकांच्या या मताला अप्रत्यक्षपणे विरोध करणाऱ्या पाचवी इयत्तेच्या प्रश्नपत्रिकेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी आयएएस अधिकारी बद्री लाल स्वर्णकार यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. १९४३-४४ वर्षातील सहामाई परीक्षेची ही प्रश्नपत्रिका इयत्ता पाचवीच्या गणित विषयाची आहे. १०० गुणांसाठी असलेल्या गणिताच्या पेपरमध्ये ३३ गुण मिळलेले विद्यार्थी उतीर्ण होतील असे त्यात लिहिले आहे. या परीक्षेचा कालावधी अडीच तासांचा असल्याची नोंद त्यात पाहायला मिळते. गणिताच्या तज्ज्ञ मंडळींना घाम फुटावा असे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. यातील बरेचसे प्रश्न हे गणितासह व्यवहार ज्ञानावर आधारलेले असल्याचे लक्षात येते.

कष्टाचं चिज…! २७ वर्षे नोकरी, एकही रजा नाही; निवृत्तीनंतर गिफ्टमध्ये मिळाली ३ कोटींहून अधिकची रक्कम, कसं ते जाणून घ्या

८० वर्षांपूर्वीच्या या कठीण प्रश्नपत्रिकेची सोशल मीडियावर चर्चा आहे. अनेकांनी ‘हा गणिताचा पेपर एखाद्या कॉमर्स कॉलेजमधील पेपरपेक्षा जास्त अवघड आहे’ असे म्हटले आहे. तर काहींनी ‘पूर्वीच्या शिक्षण प्रणालीमध्ये व्यवहारिक ज्ञान दिले जात असे’. अशा कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने गंमतीने ‘मला पेपर वाचून चक्कर येत आहे’ असे लिहिले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘जुनं ते सोनं’ ही कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 80 year old maths question paper of 5th class of 1943 examination year went viral on social media know more yps
Show comments