अभ्यास करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. स्मार्ट क्लास आणि गुगलसह सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून, मुलांना लवकर आणि सहज शिकवले जात आहे. दरम्यान, पूर्वीचा अभ्यास मात्र इतका सोपा नव्हता. अशातच १९४४मधील एक प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यातील प्रश्न वाचून भल्याभल्यांना घाम फुटला आहे.
सध्या पाचवी वर्गाचा एका प्रश्नपत्रिकेची चर्चा चांगलीच सुरु आहे. एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने हा पेपर टि्वट केला आहे. बद्रीलाल स्वर्णकार यांनी टि्वटवर हा पेपर दिला आहे. त्याला सोशल मीडियातील युजर्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ८० वर्षांपूर्वी म्हणजेच देश स्वातंत्र होण्यापूर्वी पाचवीचा असलेला अभ्यासक्रम पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. १९४३-४४ मधील सहामाही परीक्षेचा हा पेपर आहे.
पाचवीत कॉमर्स विषय
स्वर्णकार यांनी शेअर केलेल्या या पोस्टसमोर स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रश्न त्यानंतर युजर्स विचारत आहे. अनेकांना 5वी मध्ये कॉमर्स शिकवले जात असल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसईसह अनेक बोर्ड दहावीनंतर कॉमर्स विषयाचा पर्याय देतात. परंतु सेवानिवृत्त आयएएस अधिकारी बद्रीलाल स्वर्णाकर यांनी सोशल मीडियावर 80 वर्षांचा कॉमर्स पेपर शेअर केला आहे. हा पेपर इयत्ता 5वीच्या सहामाही परीक्षेचा आहे.
पाहा प्रश्नपत्रिका
हेही वाचा – बॉयफ्रेंडने घेतला बदला! ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडकडून मागितली ‘ही’ गोष्ट
या पेपरमधील प्रश्न पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्या काळात विद्यार्थ्यांची कशी कसोटी लागत असणार? हे यामधून स्पष्ट होत आहे.