Video : सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून डोळे भरून येतात, तर काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ८० वर्षांचे एक आजोबा चक्क स्वत: जेवण बनवून विकत आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, आजोबांची एक छोटी टपरी आहे आणि या टपरीवर ते स्वत: पोळ्या लाटताना दिसत आहेत. व्हिडीओत पुढे दिसते की, आजोबा गरमागरम पोळी लाटतात आणि एका तरुणाला भाजी पोळीची थाळी सर्व्ह करतात. हे आजोबा ८० वर्षांचे असल्याचे व्हिडीओत सांगितले आहे.
वयाच्या ८० व्या वर्षी आजोबा पोटापाण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक होऊ शकतात. विशेष म्हणजे आजोबा ही थाळी फक्त २० रुपयांना विकत आहे.

हेही वाचा : Monsoon Skincare Routine : पावसाळ्यात ग्लोइंग आणि फ्रेश त्वचेसाठी ‘या’ ट्रिक्स फॉलो करायलाच हव्यात!

yummybites_kt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ” या आजोबांसाठी एक शब्द लिहा.” हा व्हिडीओ उत्तरप्रदेश येथील असल्याचे कॅप्शनमध्ये सांगितले आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्स तर व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. एका युजरने लिहिले, “माझ्याकडे शब्द नाही, खूप खूप आदर”; तर एका युजरने लिहिले, “आजोबांनी थाळीचे रेट वाढवायला पाहिजे”, आणखी एका युजरने लिहिले, “प्रेरणा देणारा व्हिडीओ. “

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 80 years old man cooking and selling 20 rupees food thali inspirational video goes viral on instagram ndj
Show comments