Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण आपली मते व्यक्त करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका वृद्ध व्यक्तीने तरुणाईला यशस्वी वैवाहिक जीवनाचा एक मोलाचा सल्ला दिला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण निवांत बसलेल्या आजोबांबरोबर बातचीत करताना दिसतो. सुरुवातीला तरुण आजोबांना विचारतो, “तु्म्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीचे दु:ख किंवा खेद आहे?” त्यावर आजोबा म्हणतात, “नाही, मी आनंदी आहे” त्यानंतर तरुण आजोबांना दुसरा प्रश्न विचारतो, “तुम्ही लोकांना एखादी टिप सांगू शकता का की ज्यामुळे खेदमुक्त जीवन ते जगू शकतील?” त्यावर आजोबा म्हणतात, “काम हीच पूजा आहे. सातत्याने काम करा तुम्हाला आनंद मिळेल. मी आता ८२ वर्षाचा आहे” त्यावर तरुण म्हणतो, “तुम्हाला आता कसं वाटतं?” त्यावर आजोबा म्हणतात, “मी आनंदी आहे.” त्यानंतर तरुण विचारतो, “तुमच्या लग्नाला किती वर्षे झाली?” त्यावर आजोबा सांगतात, “५० हून अधिक वर्षे. नुकतीच माझी पत्नी वारली, २०१४ मध्ये” त्यानंतर तरुण आजोबा विचारतो, “वैवाहिक आयुष्यात किंवा नातेसंबंधात आनंदी कसं राहायचं, यासाठी तरुणाईला तुम्ही सल्ला देऊ इच्छिता?” त्यावर आजोबा सांगतात, “फक्त सांभाळून घ्या. पती पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे” शेवटी तरुण त्यांचे आभार मानतो.
पाहा व्हिडीओ
thinkwithabhay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने खेद मुक्त आयुष्य जगण्यासाठी आणि नातेसंबधाविषयी एक मोलाचा सल्ला दिला आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजोबांच्या डोळ्यांकडे पाहा” तर एका युजरने लिहिलेय, “या पिढीला खऱ्या प्रेमाचा अर्थ माहिती आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही जुनी पिढी नाही तर अनुभवी पिढी आहे. आपण या पासून शिकायला पाहिजे.”