प्रेम ही अशी एक भावना आहे ज्यासाठी लोक काहीही करू शकतात. आजवर आपण अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील ज्यामध्ये प्रेमींनी आपले प्रेम मिळवण्यासाठी अनेक कठीण गोष्टी केल्या आहेत. प्रेमात असलेले लोक तहानभूक विसरतात. इतकंच नाही तर त्यांना प्रेम सोडून इतर कोणत्याच गोष्टीची फिकीर नसते. सध्या सोशल मीडियावर एक वेगळंच प्रकरण चर्चेत आलंय. यानंतर नेटकऱ्यांनी आपल्या डोक्यावर हात मारून घेतला आहे. ही लव्हस्टोरी पाहून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर ही अजब-गजब लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे. पोलंड येथे राहणाऱ्या एक महिला पाकिस्तानमधील एका ऑटो मेकॅनिकच्या प्रेमात पडली. यानंतर ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी स्वतः पाकिस्तानात आली. पण हे प्रकरण इथेच संपलं नाही. विशेष म्हणजे या मुलाचे वय २८ वर्ष असून ती महिला तब्बल ८३ वर्षांची आहे. सध्या हे जोडपे त्यांच्या वयातील अंतरामुळे चर्चेत आलंय.

Video : चालत्या बाइकवरून शेजारच्या दुचाकीस्वाराला मारत होती लाथ; पण दुसऱ्याच क्षणी असं काही घडलं की मिळालं ‘कर्माचं फळ’

सोशल मीडियावर सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. डेली पाकिस्तान ग्लोबल नावाच्या एका चॅनेलने या जोडप्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये या महिलेचे वय ८३ वर्षे तर मुलाचे वय २८ वर्ष असल्याचं सांगण्यात आलंय. हाफिज नदीम आणि ब्रोमा अशी या पतीपत्नीची नावं आहेत. हाफिजशी लग्न करण्यासाठी ब्रोमा पोलंड येथून पाकिस्तानात आली होती. गेल्यावर्षी हे दोघे लग्नबंधनात अडकले. एका मीडिया रिपोर्टनुसार, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त प्रसारित झालेल्या त्यांच्या मुलाखतीनंतर हे जोडपे पुन्हा एकदा चर्चेत आले. लग्नानंतर दोघेही खूप आनंदी असल्याचे या जोडप्याचे म्हणणे आहे.

मुलीचं स्वप्न पूर्ण झाल्यावर पित्याला आकाशही झाले ठेंगणे; अतिआनंदाने झाली अशी अवस्था की…; एकदा हा Video पाहाच

सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रोमा आणि हाफिज यांची ओळख झाली होती. यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ब्रोमा पाकिस्तानात आली आणि नंतर वयाचे बंधन न पाळता दोघांनीही लग्न केले.