वाढत्या वयाबरोबर माणसाची क्रियाशीलताही मंदावत जाते. परंतु एका ८६ वर्षीय आजोबांनी चक्क चार लाख किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम केला आहे. हा अनोखा विक्रम करणाऱ्या आजोबांचे नाव ‘बायल्हाली रघुनाथ जनार्दन’ असे आहे. त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी सायकल चालवण्यास सुरुवात केली. गेल्या २२ वर्षात त्यांनी चार लाख किलोमीटर सायकल चालवली आहे.
लहानपणी त्यांना आकडी (फिट) येत असे. यावर त्यांनी अनेक प्रकारचे उपचार घेतले परंतु तरीही तो आजार बरा झाला नाही. यावर शेवटचा उपाय म्हणून त्यांनी सायकल चालवण्यास सुरुवात केली. आणि पाहता पाहता त्यांचा आजार बरा होउ लागला. सायकल चालवण्यामूळे त्यांचा आकडीचा आजार बरा झाला. त्यामूळे त्यांनी आणखीन सायकल चालवण्यास सुरुवात केली. सायकल चालवण्याव्यतिरिक्त त्यांनी २० वेळा हिमालय पर्वतावर ट्रेकिंगदेखील केली आहे. शिवाय ते मॅरेथॉन शर्यतीतही भाग घेतात.