Viral Video : महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तुम्ही रायरेश्वर किल्ल्याविषयी अनेकदा ऐकले असेल. रायरेश्वर किल्ला पुणे जिल्ह्यात असलेल्या भोरवरून २७ किमी अंतरावर आहे. सध्या या किल्ल्यावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ८६ वर्षांचे आजोबा किल्ला सर करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. असं म्हणतात, धाडसाला वयाचे बंधन नसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या आजोबांचे चाहते व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजोबा रायरेश्वर किल्ला उत्साहाने सर करत आहे. धोती, सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून किल्ला चढणाऱ्या मराठमोळ्या आजोबांनी सोशल मीडियावर सर्वांना आश्चर्यचकीत केले आहेत. आजोबा तरुणांबरोबर गड किल्ला सर करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण आजोबाला विचारतो, “तुमचे वय किती आजोबा?” त्यावर आजोबा सांगतात, “८६” त्यावर तरुण म्हणतो, “८६ वय आहे तरीपण..” त्यावर आजोबा म्हणतात, “तरीपण चढायचं” त्यावर तरुण म्हणतो, “आम्ही ८६ वयापर्यंत चढणार का?” त्यावर आजोबा म्हणतात, “मेहनत केली का बालपण मग कुठून चढणार. मी १०० -१०० बैठक काढायचो” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आजोबांची ऊर्जा पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
sahya.veda या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कुठून येते एवढी स्फुर्ती, अन् कुठून येते येवढे धाडस, वयाची ८० पालटली तरी येवढा उत्साह, अन् आवाजात तेवढीच दणकेबाजी, फक्त आणि फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यामुळेच..”
हेही वाचा : पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा! विद्यार्थ्याने चक्क कंपासपेटीमध्ये लपवून आणला फोन, VIDEO व्हायरल
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे माझे चुलत आजोबा ह भ प शिवाजीदादा बागल जेष्ठ किर्तनकार येलमरवाडी ता.खटाव जि.सातारा मधील आहेत.माझे सख्खे आजोबा आणि शिवाबाबा यांनी आयुष्य भर निस्वार्थी पांडुरंगाची सेवा केली. शिवाबाबाचे भाऊ नावाजलेले आप्पा आर्मी मध्ये कॅप्टन होते .दोघे भाऊ भजनात किर्तनात सतत बरोबर असायचे. अशी राम लक्ष्मणाची जोडी. आम्ही कधी त्यांना भांडण करताना बघितले नाही. जिवापाड प्रेम भावना भावात ह्या वयात पण आहे. रामकृष्ण हरी.” तर एका युजरने लिहिलेय, “८६ वर्षात रायरेश्वर पठार” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपण चढू पण तोवर जगलो पाहिजे. ही जुनी हाडे आहेत. आपली पिढी ५८ व्या वर्षी जरी वर चढली तरी फार झाले” एक युजर लिहितो, “महाराजांचं नाव घेतलं ना एक नवी स्फूर्ती मिळते … महाराजांच्या गड किल्ल्यावर चढायचं म्हणजे आणखी उत्साह वाढतो”