तुम्हाला जर लॉटरी लागली तर….? असा प्रश्न विचारला तर तुमच्यासमोर एक भलीमोठी यादी उभी राहील. लॉटरीतून मिळालेल्या पैशातून कुणी परदेशवारी करण्याचं ठरवेल, तर कुणी त्या पैशातून स्वतःच्या आवडीच्या वस्तू खरेदी करतील. काही जण त्यांचं स्वप्नातलं घर प्रत्यक्ष उभारण्यासाठी त्या पैशांचा वापर करेल. बरोबर ना? पण सध्या सोशल मीडियावर अशा एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जिला नशीबाने लॉटरी लागली खरी, पण तिने ते पैसे स्वतःसाठी वापरलेच नाही. होय, आता तुम्ही म्हणाल, पैसे कुणाला नकोय. हे शक्य आहे का? तर हो, खरंय. एका ८६ वर्षीय आजीला लॉटरी लागल्यानंतर ज्याच्याकडून लॉटरीचं तिकीट खरेदी केलं त्यांनाच लॉटरीची अर्धी रक्कम देऊ केली. आजीबाईंच्या या औदार्याने लॉटरीसोबतच सोशल मीडिया लोकांची मनेही जिंकली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही ‘गुड न्यूज’ कॅलिफोर्नियामधली आहे. कॅलिफोर्नियामधल्या रँचो मिराजमध्ये मॅरियन फॉरेस्ट या ८६ वर्षीय आजी राहतात. दर आठवड्याला त्या ड्यूकच्या मिनी मार्टला जात होत्या आणि आपलं नशीब आजमावण्यासाठी त्या लॉटरीचं तिकीट घेत होत्या. दर आठवड्याला त्या स्वत:साठी ५ लोट्टो लॉटरीची तिकिटे विकत घेत होत्या. पण यंदाचा आठवडा हा त्यांच्यासाठी काही औरच ठरला. कारण या आठवड्यात त्या रिकाम्या हाताने गेल्याच नाहीत. यंदाच्या आठवड्यात जेव्हा त्या लॉटरीचं तिकीट काढण्यासाठी गेल्या, त्यावेळी नेहमीप्रमाणे याही आठवड्यात रिकाम्या हाताने परत जावे लागले का, अशी शंका या आजीबाईंना होती. त्यावर लॉटरीच्या दुकानातल्या कॅशियरने या आजीबाईंना तिकीट खरेदी करण्यासाठी सांगितलं. त्याचं म्हणणं ऐकून या आजीबाईंनी लॉटरी तिकीट खरेदी केलं. जर या वेळेला लॉटरी लागली तर मी तुझी काळजी घेत जाईल, असा शब्द यावेळी आजीबाईंनी त्या दुकानातल्या कॅशिअरला दिला.

आणखी वाचा : गुड बॉय! हा चिमुकला सकाळी ६ वाजता उठून स्वतःची कामं करतो आणि स्वयंपाक सुद्धा करतो…, पाहा हा VIRAL VIDEO

ते म्हणतात ना…’देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाडके’, हिंदीतली ही उक्ती या आजीबाईंच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरली. या आठवड्यातलं आजीबाईंचं नशीब इतकं जबरदस्त होतं की, एका झटक्यात या आजीबाईंना ३०० डॉलरची लॉटरी लागली. ही लॉटरी जिंकल्यानंतर आजीबाईंनी कॅशिअरला दिलेला शब्द पाळला. फुगे आणि एक लिफाफा हातात पकडत या आजीबाई लॉटरीच्या दुकानात पोहोचल्या.

आपण आजीबाईंना लॉटरी घेण्यासाठी सांगितलं आणि त्यांना लॉटरी लागली सुद्धा, हे पाहून या कॅशिअरचा आनंद गगनात मावेनासा झाला. या आनंदाच्या भरात कॅशिअरने आजीबाईंना मिठी सुद्धा मारली. हे पाहून आजुबाजुचे लोक सुद्धा टाळ्यांच्या कडकडाटात आजीबाईंचं अभिनंदन करताना या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. आजीबाईंनी कॅशिअरला दिलेले शब्द पाळत लॉटरीमधून जिंकलेल्या रक्कमेतील अर्धी रक्कम या लिफाफ्यात भरून ती कॅशिअरकडे सोपवली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : OMG! मार्केटमध्ये शॉपिंग करताना अचानक साप दिसला आणि…पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अरे बापरे! सिंहाला कडेवर घेत फिरत होती महिला; VIRAL VIDEO पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

या व्हिडीओमधल्या आजीबाईंचं सर्वत्र कौतुक करण्यात येतंय. हा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर goodnews_movement नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडला आहे. एक दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. अवघ्या एका दिवसात या व्हिडीओला तब्बल ६.३ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

या व्हिडीओवर लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओमधल्या आजीबाईंच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलंय. तर एका यूजरने कमेंट केली की, या दोघांना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवा. दुसऱ्या एका युजरने कमेंट करताना लिहिलं की, महिलेचा प्रामाणिकपणा आम्हाला आवडला आहे.