पंजाबमधील डेरा बस्सी येथील त्रिवेदी कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका ८८ वर्षीय आजोबांच नशीब पालटल आहे. शिवाय मागील ३५ ते ४० वर्षापासूनचं त्यांचं स्वप्न पुर्ण झालं आहे. कारण या आजोबांना एक दोन नव्हे तर तब्बल ५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. महंत द्वारकादास असं या लॉटरी जिंकलेल्या आजोबांचे नाव आहे. याबाबतचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेची माहिती देताना सहाय्यक लॉटरी संचालक करम सिंग यांनी सांगितलं की, ‘पंजाब राज्य लोहरी मकर संक्रांती बंपर लॉटरी २०२३ चा निकाल १६ जानेवारीला ऑनलाईन घोषित करण्यात आला. त्यामध्ये डेराबस्सीच्या द्वारका दास या ८८ वर्षीय आजोबांनी ५ कोटी रुपयांचे पहिले लॉटरीचे बक्षिस जिंकले. शिवाय लॉटरीशी संबंधित काही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० टक्के कराची रक्कम कट करुन उर्वरीत सर्व पैसे द्वारकादास यांना दिले जातील.’

पाच कोटींचे पहिले बक्षिस जिंकणाऱ्या महंत द्वारकादास यांचा मुलगा नरेंद्र कुमार शर्मा याने सांगितलं की, ‘मला खूप आनंद झाला आहे.’ तर द्वारकादास यांनी म्हणाले, “मी मागील ३५ ते ४० वर्षांपासून लॉटरीचे तिकीट खरेदी करत आहे, आणि यावेळी मी लॉटरी जिंकली आहे. तर जिंकलेली रक्कम दोन मुलांमध्ये आणि त्यांच्या ‘डेरा’मध्ये वाटणार आहे.’

नरेंद्र शर्माने सांगितलं की, वडीलांनी माझ्या पुतण्याला लॉटरीचे तिकीट घेण्यासाठी पैसे दिले होते. आता त्यांना ही लॉटरी लागल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. तर वृद्ध द्वारकादास हे गावातील एका मंदिरात महंत असून त्यांनी काही दिवसांपूर्वी हे लोहरीचे बंपर तिकीट जिरकपूर येथून खरेदी केले होते. लॉटरी जिंकल्याने गरीब महंताच्या कुटुंबात व गावातदेखील आनंदाचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 88 year old man wins rs 5 crore lottery in punjab after buying tickets for 35 40 years trending news jap
Show comments