माणूस मनानं तरुण असला कि मग त्याचं वय हे अगदीच गौण असतं. तो फक्त एक आकडा असतो. अशीच माणसं आपल्याला भरभरून जगायला शिकवतात नाही का? तुमच्याही आजूबाजूला अशी काही मंडळी असतील. ही मंडळी वयानं, अनुभवानं खूप मोठी असतात पण त्यांच्यातलं लहान मुलं कायम जागं असतं. आताच्या सोशल मीडियाच्या जगात तर आपल्याला कित्येक व्हिडीओ, फोटोजमधून वारंवार ह्याची प्रचिती येते. तर आता असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहेत. हा व्हिडीओ आहे ८९ वर्षांच्या आजी आणि नातवाच्या जोडीचा. आपल्या नातवाबरोबर दिलखुलासपणे नाचणाऱ्या या आजीने सोशल मीडियावर असंख्य मनं जिंकली आहेत. काहीच आठवड्यांपूर्वी ‘आय डोन्ट बिलिव्ह इन सोलमेंट्स’ या इंस्टाग्राम ट्रेंडमधील गाण्यावर आजी आणि नातवाच्या या जोडीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाहुयात आजी आणि नातवाच्या जोडीचा व्हिडीओ
आणखी वाचाView this post on Instagram
मजेदार ‘नागीन डान्स’
अंकित जांगिद या कंटेंट क्रिएटरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, “माझ्या दादीमध्ये मला माझ्या आयुष्याचा सोबती सापडला.” ह्या व्हिडिओमध्ये गुलाबी साडी नेसलेल्या आजी आपल्या नातवासह अगदी मग्न होऊन ‘नागीन डान्स’ करताना दिसत आहेत. यावेळी या आजी अगदी आपल्या देसी स्टाईलमध्ये नाट्यमय आणि मजेदार हावभावांसह नाचताना दिसत आहेत. तर नातू त्यांचा स्टाइलचं अनुकरण करत त्यांना दाद देत आहे.
अनोखी जोडी आणि नात्यातला गोडवा पाहून नेटकरी भारावले
आता नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या आजी-नातवाच्या जोडीचा असा मजेदार, दिलखुलास अंदाज आवडला नसता तर नवलच! अर्थातच या व्हिडीओने इन्टाग्रामवर असंख्य नेटकऱ्यांची मनं जिंकली. ही अनोखी जोडी, त्यांच्या नात्यातला गोडवा आणि प्रेम पाहून अनेक जण भारावून गेले. इन्टाग्रामवर या व्हिडिओला १० हजारांहूनही जास्त लाईक्स मिळाले आहेत. इतकंच नव्हे तर या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाहायला मिळाला आहे.
एका इंस्टाग्राम युझरने या व्हिडीओवर कमेंट केली कि, “हा व्हिडीओ पाहून माझा दिवस चांगला झाला. आजीला मनमोकळं हसताना पाहून समाधान मिळालं.” तर दुसऱ्या एका युझरने म्हटलं कि, “हा माणूस आणि यांचा डान्स अनोखा आहे.” तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कसं वाटलं?