Birthday In Victorian Style: ब्रिटनच्या राजघराण्यातील महत्त्वाची राणी, व्हिक्टोरिया! जिच्या नावे ‘व्हिक्टोरिअन एज’ हा मोठा कालखंड नावाजला जातो. जगभराच्या राजकारणावर अधिपत्य असणारी तरीही पॅलेसमध्ये घरगुती गृहिणी म्हणून वावरणाऱ्या या राणीच्या स्टाईलबाबत लोकांमध्ये आजही बरीच क्रेझ आहे. राणी व्हिक्टोरियाची स्टाईल आजच्या फॅशनच्या युगातही ट्रेंडमध्ये आहे. याचं उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ८९ वर्षीय आजीने चक्क राणी व्हिक्टोरिया स्टाईलमध्ये आपला वाढदिवस साजरा केलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल २३ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

कंटेंट क्रिएटर स्नेहा देसाई यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांची ८९ वर्षीय आजीच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याचं दिसून येत आहे. स्नेहा देसाईने व्हिक्टोरियन स्टाईलमध्ये हाय-टी-थीम असलेली वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या त्या राणी व्हिक्टोरियाच्या स्टाईलमध्ये असलेल्या आजी. त्यांचा हा नवा लूक पाहून कुटुंबीयांनाच आश्चर्य वाटलं. सारेज जण या आजींकडे एकटक पाहू लागले.

आणखी वाचा : हे काय? चक्क माणसांना पाहून सिंह घाबरला! विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहा

आजीने तिच्या वाढदिवशी राणी व्हिक्टोरियासारखा सुंदर ड्रेस तर घातलाच शिवाय त्यावर साजेसा असा मेकअपही केला. या लूकमध्ये आजी खूपच सुंदर दिसून येत होत्या. त्यांनी लिलाक गाऊन घातलेला दिसून येत आहे आणि वयाच्या ८९ व्या वर्षी आजी खूप गोंडस दिसत आहेत. डोक्यावर राजेशाही कॅप, हातमोजे आणि हातात पंखा हा लूक खूपच आकर्षक वाटू लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत वाढदिवसाचा केक कापला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वेढलेलं होतं. इतर कुटुंबियांनी सुद्धा थीमनुसार कपडे घातले होते.

आणखी वाचा : खरे अमिताभ बच्चन कोण सांगा? हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल!

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आजी ८९ वर्षांची झाली. वय ही फक्त एक संख्या आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी मला माझ्या आजीची असलेल्या भावना आणि उर्जा फार आवडते! ती अजूनही प्रत्येक छोट्या गोष्टीचा आनंद घेते ते मला आवडते. त्या आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

आणखी वाचा : फूड डिलिव्हरीसाठी चक्क उंच इमारतीवर उडत उडत गेला, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : “बाघ की नजर पर कभी संदेह नहीं करते!” शिकार न करता निघून गेला, मग काय झालं पुढे? पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. काही यूजर्स तर आजींच्या सौंदर्याचं कौतूक करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हे किती क्यूट आहे. ती खूप आनंदी दिसते. दुसर्‍या यूजरने कमेंट केली, ‘इंटरनेटवर आतापर्यंतची सर्वात सुंदर गोष्ट.’ तिसऱ्याने लिहिले, ‘ती खूप क्यूट आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

या व्हिडीओमधल्या आजीची स्टाईल लोकांना खूप आवडू लागली आहे. व्हिक्टोरिया स्टाईलमधल्या या आजीने लोकांची मने जिंकली आहेत. यामुळेच व्हिडीओला आतापर्यंत 2 मिलियन इतके लाईक्स मिळाले आहेत.

Story img Loader