अमेरिकेच्या पोर्टलँट येथील रुग्णालयात एक अजब घटना घडली आहे. लेबर अॅन्ड डिलिव्हरी यूनिटमध्ये काम करणाऱ्या ९ नर्स एकाच वेळी गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या सर्व नर्सची प्रसूती एप्रिल किंवा जुलै महिन्यात होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
या सर्व नर्स काम करत असलेल्या मेडिकल सेंटरने फेसबुक पोस्टव्दारे याबाबत माहिती दिली आहे. पोस्टसह एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये ९ नर्सपैकी ८ नर्स या बेबी बंपसह फोटोमध्ये दिसत आहेत.
रुग्णालयातील सर्व नर्स एकाच वेळी गर्भवती असल्यामुळे त्या ऐकमेकींची काळजी घेत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील नाते आणखी चांगले झाले आहे. त्यातील एक एरिन ग्रेनिरने सांगितले की, ‘एक वेळ अशी आली, जेव्हा आम्ही सगळ्या गर्भवती असल्याचे ऐकमेकींना सांगू लागलो. आम्ही सगळ्या फार आनंदी होतो. एकदा अशीही वेळ आली की आम्हाला रुग्णालयातील सर्वांची काळजीदेखील घ्यावी लागली होती.’
रुग्णालयातील इतर कर्मचारी या नर्सची काळजी घेत आहे. त्यांचे खाणे तसेच रुग्णालयातील त्यांच्या कामाच्या वेळा देखील त्यांच्या सोयीनुसार ठेवण्यात येत आहेत. ९ नर्स प्रसूती रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी नवीन ९ नर्स रुग्णालयात रूग्णालयात रुजू होतील.