ब्रिटीश गॉट टॅलेंट या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये आसामच्या अभिषेकच साहूची निवड झाली आहे. येत्या ६ नोव्हेंबरला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अभिषेक ब्रिटनला रवाना होणार आहे. नऊ वर्षांच्या अभिषेक ओडिशा राज्यातल्या कटक गावात राहतो. वयाच्या तिस-या वर्षांपासूनचे अभिषेक उत्तम ड्रम वाजवतो. त्याच्या या कलेने भले भले आश्चार्याने तोंडात बोटे घालतात. हिंदी, ओडिशा, पंजाबी, इंग्रजीच काय अगदी चीनी गाण्यांच्या तालावर अभिषेक उत्तम ड्रम वाजवू शकतो. आपल्या कलेने याने जगभरातील अनेक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. अभिषेकने जगभरात अनेक ठिकाणी दौरे केले आहेत. लहानपणापासून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्याने आपली कला दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी एका राज्यस्तरीय कार्यक्रमात छोट्या अभिषेकला पुरस्कार म्हणून रोख रक्कम मिळाली होती. या रक्कमेतला काही हिस्सा त्याने गरजू मुलांना दान म्हणून दिला होता. ब्रिटीश गॉट टॅलेंट सारखा रिअॅलिटी शो हा प्रत्येक स्पर्धेकला जागतिक पातळीवर आपली कला दाखवण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ब्रिटनहून त्याला बोलावणे आले. येत्या सहा तारखेला तो रवाना होणार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात जाऊन अभिषेक भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अभिषेकवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Story img Loader