बहुतेकजण अजूनही प्लास्टिकवर अवलंबून आहेत. प्लास्टिक हे पर्यावरणाचा नाश करत आहे हे माहित असूनही अनेकजण त्याचा वापर करतात. याबाबत अनेकदा जनजागृतीही केली जाते. असचं एक नऊ वर्षांचा मुलगा इतरांना प्रेरणा देऊन आणि शाश्वत जगण्याच्या दिशेने पाऊल उचलणे का आवश्यक आहे? याची आठवण करून बदल घडवत आहे.

शर्वेश, साईराम मॅट्रिक्युलेशन स्कूल वेस्ट तंबरमच्या विद्यार्थ्याने, संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासासाठीच्या जागतिक ध्येयांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कन्याकुमारी ते चेन्नईपर्यंत मॅरेथॉन सुरू केली आहे. शर्वेश ७५० किलोमीटरचा मार्ग सुमारे दहा दिवसात पूर्ण करेल.तो त्याच्या जागतिक विक्रम मोहिमेदरम्यान दोन लाखांहून अधिक बियाणेही लावेल. रोटरी इंटरनॅशनल आणि ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल या अशा संस्थांपैकी आहेत ज्यांनी या प्रकारच्या पहिल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे.

राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री टी मनो थंगराज यांनी शनिवारी तिरुवल्लुवर पुतळ्यापासून सुरु होणाऱ्या जनजागृतीला हिरवा झेंडा दाखवला. शर्वेशने १४६ पदके, २५६ प्रमाणपत्रे आणि ६२ बक्षिसे मिळवली आहेत, तसेच १६ रोख पारितोषिके धावण्यासाठी मिळवली आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी एक किमी रिव्हर्स रनिंगचा भारतीय विक्रमही त्याच्या नावावर आहे.शर्वेशने वयाच्या सहाव्या वर्षी आधीच ४८६ किलोमीटर धावले होते आणि यापूर्वी त्याने ५६ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.

सध्या आपण ज्या स्थितीत आहोत ती अत्यंत चिंताजनक आहे. शर्वेशची ही मोहीम आपल्यापैकी प्रत्येकाला सुधारण्यासाठी आणि स्थिरतेसाठी प्रेरित करते. एवढ्या लहान वयात तो बदल घडवण्यासाठी काम करत आहे याचं सगळ्यांना कौतुक आहे.

Story img Loader