हल्ली मुले इतकी स्मार्ट झाली आहेत की विचारता सोय नाही. म्हणजे अगदी मोबाईलमधील गेम्स खेळण्यापासून ते स्मार्ट टीव्हीमधील सेटिंगबद्दल अनेक गोष्टी लहान मुले सहज करतात. मात्र मुलांच्या या स्मार्टनेसचा कधीकधी पालकांना फटका बसू शकतो. असेच काहीसे झाले ब्रिटनमधील इयन विल्सन या ५३ वर्षीय गृहस्थाच्या मुलीने त्याच्या नकळत चक्क डिस्नेलॅण्डची संपूर्ण ट्रीपच मोबाईलवरून बूक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘द मिरर’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार इयन विल्सन हे झोपेत असताना त्यांच्या सुझॅन या नऊ वर्षीय मुलीने त्यांच्या फोन खेळण्यासाठी घेतला आणि चक्क ८५ हजारांहून अधिक रुपयांच्या तीन ते चार ट्रीप बुक केल्या. यामध्ये तिने वडिलांच्या कार्डवरील क्रेडीट कार्डचा वापर करत ३४ हजारांचे विमानाचे तिकीट, १८ हजारांची आयफेल टॉवरची व्हिआयपी ट्रीप आणि ३२ हजारांची डिस्नेलॅण्ड टूर बूक केली. तीन दिवसांनतर यॉर्कशायर बँकेच्या खात्यावरून ८५ हजार ‘पेपल’च्या खात्याकडे वळवण्यात आल्यानंतर इयन यांना या प्रकराबद्दल समजले.

या प्रकराबद्दल इयन म्हणतात, ‘सुझॅनला ती काय करत होती याची कल्पनाही नव्हती. आणि या चुकीसाठी मी तिला शिक्षाही करु शकत नाही.’ घडलेल्या प्रकारानंतर सुझॅन थोडी अस्वस्थ झाली असून तुम्हाला सगळे पैसे परत कमावण्यात मदत करेल असे आश्वासनही तिने दिल्याचे इयन यांनी सांगितले. मात्र घडलेला सर्व प्रकार इयन यांनी बँक तसेच ‘पेपल’ला सांगितल्यानंतर त्यांच्या विनंतीनंतर ही बुकिंग रद्द करुन इयन यांचे सर्व पैसे परत केले आहेत.

या प्रकरणामधून धडा घेत इयन यांनी यापुढे जास्त सतर्क राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांना इंटरनेट वापरण्याची योग्य समज येईपर्यंत त्यांच्या हातात डिजिटल डिव्हाइस देऊन नये, अशी विनंतीही विल्सन दांपत्याने केली आहे.