Viral Video : सोशल मीडियावर एका ९ वर्षाच्या चिमुकल्याची जोरदार चर्चा आहे. वाराणसीच्या या चिमुकल्याला ब्रेन ट्युमर आहे. तो जगण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याचे स्वप्न होते की त्याने एक दिवस आयपीएस अधिकारी व्हावे. मग काय, एडीजी झोन वाराणसीच्या पोलिसांनी या चिमुकल्याची इच्छा पूर्ण केली आणि त्याला एका दिवसासाठी आयपीएस अधिकारी बनवले. त्याचा आनंद गगनात मावेनासा होता. वाराणसीच्या पोलिसांनी केलेल्या या चांगल्या कार्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. (9 year old with brain tumour becomes IPS Officer for a day)

असं म्हणतात, आयुष्य हे एकदाच मिळते आणि ते मनभरून जगावे. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या चिमुकल्याने एक दिवस मनभरून जगला. कारण त्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मोलाचा वाटा आहे तो वाराणसीच्या पोलिसांचा. पोलिसांना चिमुकल्याची इच्छा पूर्ण करत माणुसकीचे सुंदर दर्शन घडवले आहेत.

फक्त ९ वर्षाचा असलेला रणवीर भारती सध्या मरणाशी झुंज देत आहे. महामना कॅन्सर हॉस्पिटलमध्ये चिमुकला सध्या उपचार घेत आहे. त्याची इच्छा होती की त्याने मोठे होऊन आयपीएस अधिकारी व्हावे पण एवढ्या लहान वयात त्याला ब्रेन ट्युमर झाला आणि सर्व स्वप्ने एका क्षणात दूर झाली पण वाराणसीच्या पोलिसांना जेव्हा या चिमुकल्याची इच्छा कळली तेव्हा त्यांनी रणवीरला एका दिवसासाठी आयपीएस अधिकारी होण्याची संधी दिली.

हेही वाचा : शिवरायांचा मावळा कधी थकत नाही! ८६ वर्षांच्या आजोबांनी सर केला किल्ले रायरेश्वर; प्रेरणादायी VIDEO व्हायरल

पाहा पोस्ट

हेही वाचा : ऐकावं ते नवलंच! घड्याळ आणि लॅपटॉप चोरून चोराने कंपनीच्या मालकाला लिहिली चिठ्ठी, कार्यालयाची सुरक्षा सुधारण्याचा दिला सल्ला

या विषयी वाराणसीच्या एडीजी झोनच्या पोलिसांनी एक्स अकाउंटवर रणवीरच्या आयपीएस अधिकाऱ्याच्या वेशभूषेतील फोटो शेअर करत लिहिलेय,”९ वर्षाच्या रणवीर भारती महामना कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ब्रेन ट्युमरचा उपचार घेत आहे. अशा परिस्थितीत रणवीरने आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा पूर्ण केली. एडीजी झोन वाराणसी येथील पियुष मोरदीया यांच्या कार्यलयात या चिमुकल्याची इच्छा पूर्ण करण्यात आली.”

पोलिसांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मन जिंकले सर, मनापासून खूप मोठा सलाम” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान काम केले” अनेक युजर्सना पोलिसांचे हे सुंदर काम खूप आवडले आहेत.