Viral Video : कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती ही पुरस्कारांमधून मिळते. फिल्मफेअर पुरस्काराला सिनेसृष्टीत मानाचे स्थान आहे. प्रत्येक कलाकार या खास पुरस्कार सोहळ्यासाठी आतुरलेला असतो. या पुरस्कार सोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, गायक याशिवाय चित्रपटात योगदान देणारे पडद्यावरील आणि पडद्यामागील सर्व व्यक्ती उपस्थित असतात. कलाकार त्यांच्या हटके लूक आणि अंदाजात हजेरी लावतात. प्रत्येकांची नजर त्यांच्याकडे असते. हल्ली फिल्मफेअर पुरस्कार सोहळा सुरू होताच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात पण पूर्वी सोशल मीडिया इतका पसरलेला नव्हता. त्यामुळे फिल्मेफेअर पुरस्कारांची एखादी झलक पाहायला मिळणे, हे खूप मोठी गोष्ट वाटायची. सध्या असाच एक फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ९० च्या दशकातील फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचा आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला नव्वदच्या दशकातील सिने अभिनेते आणि अभिनेत्री दिसतील. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ कोणालाही आवडले. अनेकांना नव्वदच्या दशकातील त्यांचे आवडते सिने अभिनेते आणि अभिनेत्री दिसेल. व्हिडीओत तुम्हाला श्रीदेवी, माधुरी दिक्षीत, अनिल कपूर, अमरिश पुरी, रेखा, जॅकी श्रॉफ, आमीर खान, रविना टंडन, अमिताभ बच्चन, जया बच्चन, महेश भट, मुकेश खन्ना, भाग्यश्री, जुही चावला, राजेश खन्ना, सलमान खान असे असंख्य सिनेस्टार या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.नव्वदच्या काळातील फिल्मफेअर पुरस्कार सोहळा कसा असायचा, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज येईल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : याला म्हणतात खरी श्रीमंती! विक्रेत्याकडून पक्षी खरेदी केले अन् आकाशात उडवले, पाहा व्हायरल VIDEO

star_retrotv या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फिल्मफेअर पुरस्कार १९९० | बॉलीवूडमधील लोकप्रिय चेहरे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा एक कौटुंबिक कार्यक्रम वाटतोय” तर एका युजरने लिहिलेय, “जुनं ते सोनं” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा बॉलीवूडमधील सुवर्ण काळ होता”

Story img Loader