Viral Video : सध्या देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. सोशल मीडियावर दिवाळीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही लोक नव्वदच्या दशकात दिवाळी कशी साजरी केली जायचे, हे व्हिडीओतून सांगताना दिसत आहे. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये 90’sच्या तरुणाने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण म्हणतो, “आताच्या पोरांना काय कळणार आहे दिवाळी म्हणजे काय असते? १०० समानार्थी शब्द, १०० विरुधार्थी शब्द,५० म्हणी, ५० वाक्यप्रचार, १५० सुविचार, दिवाळीवर निबंध, शुद्धलेखन आणि १ ते ३० पाढे पाठांतर, शेवटचा पेपर सरांच्या हातात दिला की आम्ही किल्ला बनवण्यासाठी पळत घरला जायचो. लाल माती, पोती दगडं सगळं शोधायचो आणि किल्ला बनवायला चालू करायचो. ही मज्जा आताची मुलं घेऊ शकत नाही कारण आता रेडिमेड किल्ले आलेले आहेत. दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके आणि कपडे आणल्यानंतर आम्हाला झोप नाही लागायची. असं वाटायचं की सकाळ कधी होते. फटाक्यांच्या पिशवीकडे बघत बघत आम्ही झोपायचो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही इतका एन्जॉय करायचो की सुट्टी संपत आल्यानंतर आमच्या लक्षात यायचं दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास राहिलाय. सुट्टी संपून शाळा सुरू झाली की मित्राला पहिल्या दिवशी आम्ही सांगायचो की कसे फटाके फोडले तोपर्यंत वर्गात सर यायचे. वर्गात सर आल्यानंतर एक टवळी आमच्या वर्गात होती. ती मोठ्यानं ओरडायची, “सर दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास” आणि ती स्टीलची पट्टी पण घेऊन यायची आणि माझा कधी दिवाळीत अभ्यास पूर्ण नसायचा. पहिल्याच दिवशी मार खायचो.”
u
पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
हेही वाचा : Diwali Wishes 2024 : दिवाळीच्या द्या प्रियजनांना हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
marathi_speaker या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिवाळीच्या सुट्टीतली मज्जा…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी” तर एका युजरने लिहिलेय, “हो शंभर टक्के खरे, हा अनुभव आम्ही घेतलेला आहे पण अभ्यासही करायचं. तो काळ ती वेळ वेगळीच होती. आता आले मोबाईल कसली सुट्टी कसली सुट्टीची मजा” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप भारी दिवस असायचे ते…..आताच्या मुलांना ना पैशांची किंमत ना कशाची म्हणून तर कशातच आनंद नाही मिळत त्यांना…… काय ते आपले दिवस” एक युजर लिहितो, “खरंच दादा जुन्या आठवणी जाग्या झाल्या” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.