91 Year Old Aaji Swimming Video: “अशी शंभर नंबरी आजी ज्या घरी असेल तो खरा श्रीमंत परिवार” असं म्हणत सोशल मीडियावर एका व्हिडिओची तुफान चर्चा चालू आहे. आजवर अभिनेत्रींचे स्विमिंगपूलमधील फोटो आजवर अनेकदा चर्चेत आले होते पण आज चक्क एका ९१ वर्षीय आजीबाईंचा पोहतानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. बरं आजीबाईंचा पोशाख तर बघणाऱ्यांच्या भुवया उंचावतोय. एक दोन नव्हे तर चक्क ५५ लाख लोकांनी पाहिलेला एका गावातील तळ्यातला हा व्हिडीओ नेमका सगळ्यांना का भावतोय हे पाहूया.

युट्युबवर @bhopi & Son’s या चॅनेलवर परमेश्वर भोपी यांनी आपल्या गावाकडील आजीचा पोहतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. आपण पाहू शकता यामध्ये साधं लुगडं नेसून एक आजी तळ्याच्या काठाशी उभ्या आहेत, डोक्यावर पदर जागच्या जागी अडून बसलाय, मागून कुणीतरी त्यांना आई मारणार का उडी असं काहीसं म्हणत विचारतं आणि चक्क या आजी नितळ पाण्यात सूर मारतात. हात पाय मारत आपली पापणी लवण्याच्या आधीच या आजीबाई तळ्याच्या मध्यापर्यंत पोहोचतात. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तळ्याचं पाणी इतकं नितळ आहे की वरून पाहताना तळं बऱ्यापैकी खोल असणार हा अंदाज येतो.

shocking video
“तोंड टॉयलेट सीटमध्ये कोंबलं वरुन पाणी टाकलं अन्…” वृद्ध महिलेबरोबर घडली थरारक घटना, धक्कादायक VIDEO VIRAL
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
mother threw the little baby in the swimming pool
“अगं आई ना तू?”, पोटच्या लेकराला स्विमिंग पूलमध्ये फेकलं; VIDEO पाहताना चुकेल काळजाचा ठोका
Shocking video Cow attack on peoples children on road dangerous shocking video viral on social Media
भयंकर! गायीचा एकावेळी तिघांवर जीवघेणा हल्ला, टोकदार शिंग पोटात घुसवलं पायांनी तुडवलं अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल
Video Shows Best Friends Love
एक अतूट नातं! बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर ‘तिने’ नकळत स्पर्श केला मैत्रिणीच्या पायांना; आजींचा VIDEO एकदा बघाच
Old man plays drums at wedding emotional video viral on social Media
VIDEO: “गरिबी आणि जबाबदारी वय बघत नसते” या वयात आजोबांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Woman dressed as mermaid dancing Inside water tried to eaten by giant fish shocking video
बापरे! महिला पाण्यात जलपरी बनून परफॉर्मन्स करत होती तितक्यात समोरून आला मासा, तोंडात पकडलं डोकं अन्…VIDEO पाहून धक्का बसेल
video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक

Video: ९१ वर्षाच्या आजींनी पोहून सर्वांना केलं थक्क

हे ही वाचा<< मंदिरातील देणगीच्या वाटपावरून पुजाऱ्यांमध्ये मारामारी? Video वर होतेय प्रचंड टीका, नेमका प्रकार काय?

हा व्हिडीओ युट्युबसह सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यावर तब्बल ५०० हुन अधिक कमेंट्स आहेत. आजी या वयात पोहोतात नदी तलावात पोहोणे हा फार चांगला व्यायाम आहे आजीकडून आपल्याला पोहण्याची स्फूर्ती मिळावी अशी इच्छा काहींनी कमेंट्समध्ये व्यक्त केली आहे. जुनं ते किंमती सोन ज्याची किंमतच करता येत नाही. सलाम आजीबाई ना आमच्या. किती सुंदर पोहत आहेत अगदी आत्मविश्वासाने, आजी सगळ्या हिरोईन ना मागे सोडलं तुम्ही खूपच स्ट्राँग आहात तुमच्या आत्मविश्वासाला तोडच नाही, चांगल्या १०० वर्षे जगू दे आजी” अशा आशयाच्या सुद्धा अनेक कमेंट्स या पोस्टवर आहेत. एकाने मस्करीत “शिल्पा शेट्टीला दाखवा आमची आजी! फिट आणि फाईन.” असेही म्हटल्याचे दिसतेय. “आता तुम्हाला या आजींच्या टॅलेंटविषयी काय म्हणायचंय कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader