अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त नबंर असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण असे अनेक वयस्कर लोक असतात जे तरुणांना लाजवतील अशा पद्धतीने कामं करतात. सध्या अशाच एका वयस्कर आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. तर नेटकऱ्यांनी या आजीकडे ९३ व्या वर्षीदेखील खूप एनर्जी असल्याचं म्हटलं आहे. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्याप्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.
@geetaranga17 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन आजीच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये, आजीने लता मंगेशकर यांच्या “बिंदिया चमकेगी” गाण्यावर भन्नाट डान्स केल्याच पाहायला मिळत आहे. जो नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना लिहिलेल्या कॅप्शनवरुन हा व्हिडीओ वृद्धाश्रमातील असल्याचं दिसत आहे, आजीचा हा भन्नाट डान्स पाहून आम्ही थक्क झालो आहोत, असं अनेक नेटकरी म्हणत आहेत.
आजीच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांना तो चांगलाच आवडल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंयत १ लाख १९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे, तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे. “नमस्कार आजी, तुला कोणाची नजर लागू नये, शिवाय तु आम्हाला आशीर्वाद दे, तुजासारखा आयुष्याचा आनंद घेताना वयाची बंधन मध्ये यायला नकोत” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने आजी तुला दिर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं लिहिलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आजीच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.