राम नामात भरपूर ताकद असते असे पुराणात सांगितलं आहे. या आशेने लोक मंदिरांना भेट देतात, देवाचे दर्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे असतात. वर्षानुवर्षे तपश्चर्या करणारे अनेक भक्तही सापडतील. काही एका पायावर उभे आहेत तर काही वर्षानुवर्षे झोपलेले नाहीत. काही प्रभू श्रीरामाची वाट पाहत आहेत तर काही श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आतुर आहेत. पण ९४ वर्षीय मंथा सुब्बलक्ष्मी यांची भक्ती अप्रतिम आणि अद्वितीय आहे. रामनामाच्या भक्तीमध्ये त्यांनी असे काही केले आहे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

८० लाख वेळा लिहीले रामाचे नाव

ओडिशातील एका कुटुंबात जन्मलेल्या मंथा सुब्बलक्ष्मी यांनी आतापर्यंत ८० लाख वेळा रामाचे नाव लिहिले आहे. आणि त्यांना विश्वास आहे की लवकरच त्या एक कोटीपेक्षा जास्त वेळा रामाचे नाव लिहून पूर्ण करतील. आध्यात्मिक आणि धार्मिक कुटुंबात वाढलेल्या, मंथा सुब्बलक्ष्मी यांना आंध्र प्रदेशातील एका आध्यात्मिक शिबिरात रामाचे नाव लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे पती दिवंगत सर्वेश्वर शास्त्री हे देखील रामाचे नामस्मरण करायचे. लहानपणी त्यांनी जो संकल्प केला, तो आजही अखंडपणे सुरू आहे.

हेही वाचा – ‘मुंबईची लाईफलाईन की मृत्यूचा सापळा?’ महिलांचा जीवघेणा प्रवास, Viral video ला तब्बल ८५ मिलियन व्ह्यूज

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लोक फक्त त्यांची ही भक्ती पाहण्यासाठी जमतात, आणि त्यांचा आशीर्वाद घेतात.मंथा सुब्बलक्ष्मी गेल्या काही महिन्यांपासून उत्तराखंडमधील चंबा येथे राहत आहेत. येथे त्या लोकांना रामाचे नाव लिहिण्याचे महत्त्व समजावून सांगतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 94 year old mantha subbalakshmi writes lord ram name 80 lakh times srk