आपल्या बँक खात्यात भरपूर पैसा असावा, असे अनेकांना वाटत असते. भविष्यातील तरतुदींसाठी किंवा विविध स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक जण स्वत:च्या पैसे जमा करीत असतात. काही जण तर अगदी थोडी थोडी रक्कम जमा करून तो ठेवतात. पण, समजा कोणत्याही कष्ट वा मेहनतीशिवाय तुमच्या बँक अकाउंटमध्ये अब्जावधी रुपये जमा झाले तर? तुम्हाला हे वाचून हसायला येईल; पण एका शेतकऱ्याच्या बाबतीत असे घडले आहे. अलीकडेच एका शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये तब्बल ९९९९९४९५९९९ रुपये जमा झाले. ही रक्कम सहजपणे कोणालाही वाचता येणार नाही अशी म्हणजे ९९ अब्ज रुपये इतकी ही रक्कम आहे. एवढे पैसे एकदम जमा झाल्याचा मेसेज पाहून शेतकऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही; परंतु इतके पैसे आले कुठून, ते कुणी पाठवले या विचाराने तो गोंधळात पडला. पण, यामुळे शेतकऱ्यालाच नाही, तर बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील भादोही जिल्ह्यात ही घटना घडली आहे, अनेकदा बँक अकाउंटमधून विनाकारण पैसे कट झाल्याचे तुम्ही अनुभवले किंवा ऐकले असेल. यावेळी बँक कर्मचारी तांत्रिक त्रुटी किंवा हा कर, ते शुल्क, अशी कारणे सांगण्याचा प्रयत्न करतात. पण, उत्तर प्रदेशातील या शेतकऱ्याच्या बाबतीत बँकेने उलटेच केले.

त्या शेतकऱ्याच्या खात्यात ९९९९९४९५९९९ एवढी मोठी रक्कम आल्याचे समजल्यानंतर त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली असावी, अशी शंका त्यांना आली. त्यामुळे त्यांनी बँकेत पोहोचून या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली, तेव्हा ही सॉफ्टवेअरमधील त्रुटी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कोट्यवधी रुपये खात्यात जमा

भानू प्रकाश यांचे खाते ‘बडोदा यूपी बँकेत’ आहे. त्यांना एक दिवस बँकेचा मेसेज आला; ज्यामध्ये त्यांच्या खात्यात ९९ अब्ज रुपये जमा झाल्याचे म्हटले होते. पण, रकमेचा तो आकडा पाहून त्यांचा स्वत:च्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आपल्या खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे पाहून सुरुवातीला त्यांनाही आनंद झाला होता. पण, ही रक्कम खूपच जास्त आहे, असे समजून त्यांना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला आणि त्यांनी घाईघाईने बँक गाठली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बँकिंग सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे मूळ किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज खाते चुकून नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (NPA) बनल्यानंतर खात्यात चुकीची रक्कम दिसू लागली.

काका ‘तिची’ चूक काय? कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या तरुणीवर व्यक्तीचा जीवघेणा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेतील VIDEO केला शेअर

बँकेने खाते गोठवले

प्रसारमाध्यमांशी बोलताना शाखा व्यवस्थापक रोहित गौतम यांनी सांगितले की, सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे एवढी मोठी रक्कम बँक ग्राहकाच्या खात्यात जमा झाली. बँकेने सांगितले की, व्यक्तीने स्वत: बँकेला या घटनेची माहिती दिली. त्यामुळे ही बाब तत्काळ उघडकीस आली आणि आता या समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत. बँकेने हे प्रकरण निकाली काढेपर्यंत आणि संभाव्य गैरव्यवहार टाळण्यासाठी भानू प्रकाश यांचे खाते काही काळासाठी गोठवण्यात आले आहे. बँकेने पुढे म्हटले आहे की, लवकरच संबंधित ग्राहकाचे खाते पुन्हा सक्रिय केले जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 99999495999 credited in account up man receives huge money after bank software goes wrong sjr
Show comments