अमेरिकेतील १० वर्षाच्या मुलगी एम्मा एडवर्ड्सचे आपल्या बॉयफ्रेंडसरह लग्न केल्यानंतर काही दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. एम्माला ब्लड कॅन्सर होता. तिची शेवटची इच्छा होती की, तिला तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्न करायचे होते. न्यूयॉर्क पोस्टनुसार, एम्मा एडवर्ड्स आणि डॅनियल मार्शल क्रिस्टोफर विलियम्स यांनी २९ जून २०२३ ला एक मोठा उत्सव साजरा केला आणि १२ दिवसांनी ११ जुलै २०२३ रोजी एम्माचे निधन झाले.
एम्माला एप्रिल २०२२ मध्ये लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया (एएलएल) असल्याचे समजले. लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया एक प्रकारे ब्लड कॅन्सर असतो जो सामान्यतः मुलांमध्ये होतो. यामध्ये बोनमॅरो आणि रक्त खराब करू शकते. यामध्ये असलेल्या पेशी हळू हळू संपतात.
एलिना एडवर्डने(एम्माची आई) उघड केले की, तिची मुलगी नेहमीच निरोगी दिसत असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ती बेशुद्ध पडली, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. येथे तिच्या पायांच्या हाडांमध्ये कॅन्सर आढळून आला. डॉक्टरांनी सांगितले की, मुलांमध्ये ही ‘सामान्य’ गोष्ट आहे आणि उपचार करण्यायोग्य आहे. पण दुर्दैवाने, हे एम्माच्याबाबतीत खरे नव्हते.
एम्माचे पालक दुसर्या प्रकारच्या उपचार घेण्याचा विचार करत होते. त्यांना आशा होती की ती या आजारावर मात करू शकेल, परंतु तसे झाले नाही.
”या वर्षी जून २०२३ मध्ये, डॉक्टरांनी सांगितले की,’एम्माचा कॅन्सर बरा होऊ शकणार नाही आणि तिच्याकडे जगण्यासाठी फक्त काही दिवस राहिले आहेत.’, असे एलिना यांनी केनेडी न्यूज आणि मीडियाला सांगितले.
एम्माच्या पालकांच्या मते, तिला नवरी बनण्याची खूप आवड होती. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तिच्याकडे आता काही दिवस बाकी आहेत, तेव्हा आम्ही तिची ही इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले.
हेही वाचा – IIT अन् IIM नव्हे, या संस्थेतून शिकून पलक मित्तलला मिळाले तब्बल १ कोटींचे पॅकेज, वाचा प्रेरणादायी कथा
एम्माच्या पालकांनी सांगितले की, त्यांच्या मुलीबरोबर डॅनियल मार्शल क्रिस्टोफर विल्यम्स शिकत होता ज्याला सगळे त्याला प्रेमाने ‘डीजे’ म्हणत असे. एम्मा अनेकदा म्हणाली होती की,” तिला डीजेची नवरी व्हायचे होते. त्याच्याशी लग्न करायचे होते. जेव्हा ते फक्त आठ वर्षांचे होते तेव्हा दोघांनी लंच टाइममध्ये शाळेत “लग्न” करण्याचा प्रयत्न केला होता.”
एम्माच्या कुटुंबाचे डीजेच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत एम्माची शेवटची इच्छा पूर्ण करणार असल्याची चर्चा होती. एम्माला शाळेत लग्न करायचे होते, पण प्रशासनाने परवानगी दिली नाही.
यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी नकली लग्नाचा घाट घातला. ते दोन दिवसांत पूर्ण करायचे होते. त्यासाठी जवळच्या बागेत सर्व व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये १०० हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. एम्माच्या लग्नात तिच्या सोसायटीच्या लोकांनी खूप मदत केली. लग्नाशी संबंधित सर्व मिळालेल्या देणगीमधून करण्यात आले.
हेही वाचा – अचानक आकाशातून रस्त्यावर कोसळलं विमान अन्…..पाहा थरारक व्हिडीओ
एम्माच्या वडिलांनी तिला तिच्या आजीच्या बागेत नेले. यावेळी त्यांच्या तिसर्या इयत्तेतील शिक्षकांनी दोघे शाळेत कसे भेटले होते याबद्दल सांगितले.
एम्माच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ”हा तिच्यासाठी खूप मौल्यवान क्षण होता. तिला जे हवे होते ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. लग्नाच्या वेळी, एम्माच्या एका मित्राने बायबलमधील एक वचन वाचले. तिची सर्वात चांगली मैत्रीण तिची मेड ऑफ हॉनर होती. यादरम्यान एम्माची आई एलिनाने तिच्या जावयाचेही कौतुक केले.”
एम्माच्या जीवनाकडे पाहताना तिच्या पालकांनी सांगितले की, ते कृतज्ञ आहेत की त्यांनी त्यांच्या मुलीचे निधन होण्यापूर्वी तिचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत केली.”