Viral Video : सोशल मीडियावर अनेक अचंबित करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकला एका बिबट्याला चक्क खोलीत जेरबंद करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
अलीकडे मानवी वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे. मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याचे अनेक प्रकरणे तुम्ही वाचली असेल. या व्हिडीओमध्ये सुद्धा अशाच एका बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याचे दिसतेय. पुढे या बिबट्याबरोबर जे काही घडते, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दरवाजाच्या शेजारी सोफ्यावर बसून मोबाईवर गेम खेळताना दिसत आहे. अचानक दरवाज्यातून बिबट्या आत शिरतो आणि थेट आतमध्ये जातो. चिमुकल्याला हे लक्षात येते तेव्हा तो वेळ न घालवता खोलीचा दरवाजा लावून बिबट्याला घरात जेरबंद करताना दिसतो. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. चिमुकल्याने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला जेरबंद केले. सध्या या चिमुकल्याचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील आहे. माध्यमाशी बोलताना या चिमुकल्याने त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं, हे सविस्तर सांगितले.
Anshul Saxena या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काय प्रसंगावधान आहे.. मोहित अहिरे, १२ वर्षाच्या चिमुकल्याने बिबट्याला ऑफिस कॅबिनमध्ये जेरबंद केले.त्यानंतर मोहितने लगेच त्याच्या वडिलांना आणि सुरक्षा रक्षकाला सांगितले.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,याने थोडा जरी आवाज केला असता तर काम पच्चीस झाले असते….! खरंच मानावं लागेल याला……मोठा माणूस जरी असता एवढा समजूतदारपणा अशा परिस्थितीमध्ये घेता आला नसता..” तर एका युजरने लिहिलेय, “काय प्रसंगावधानता दाखवली. मुलगा खरंच धाडसी आणि नशीबवान आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “चिमुकला हुशार आहे.”