सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झालेले व्हिडीओ बघून आपण खूप हसतो तर काही वेळा आश्चर्यचकीत होतो. असाच आपल्याला आश्चर्यचकीत करणारा आणि भीतीदायक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हे कसे शक्य आहे? असाच प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत. व्हिडीओमध्ये लहान मूल एका मोठ्या अजगराशी आपले खेळणे असल्यासारखे खेळत आहे हे दिसते.
नक्की काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक २ वर्षांचा मुलगा १० फूट लांब अजगराशी खेळत आहे. मुलगा अशाप्रकारे अजगराशी खेळत आहे जणू ते त्याचे खेळणे आहे. त्याचवेळी अजगरही त्या मुलासोबत आनंदाने खेळत असतो. व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.कधी मुलगा त्याला पकडतो तर कधी तोंड दाबून त्याला फिरवतो. हा व्हिडीओ इंडोनेशियातील आहे. ही ३० सेकंदाची व्हिडीओ क्लिप पाहिल्यानंतर कोणीही घाबरू शकतो.
(हे ही वाचा: ‘कोहली भज्जीची दुसरी आई’ हरभजन सिंगने विराटला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही!)
(हे ही वाचा: Viral: देसी जुगाड! लग्नासाठी बनवलेले खास बूट, Video पाहून तुम्हीही हसाल)
व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओ पाहून थरकाप उडतो. हा व्हिडीओ nature27_12 नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे, जो आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत, तर काही लोक हा व्हिडीओ पाहून नाराजीही व्यक्त करत आहेत. व्हिडीओमध्ये मुलाला त्या धोक्यात टाकल्याने लोक संतापले आहेत.