Shocking news: घरात लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. अन्यथा लहान मुले काय खातील, काय तोंडात घालतील, याचा नेम राहत नाही. कोणी सेफ्टी पिन गिळली, कोणाच्या नाकात शेंगदाणा अडकला, तर कोणी खेळण्यातील बटण, बॅटरी गिळली असे अजब प्रकार पहायला मिळतात. एखादी वस्तू अन्ननलिका किंवा श्वसननलिकेत अडकल्यास लहान मुलांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंजेक्शनच्या आठ सुया गिळल्या

लहान मुलांना नव्या वस्तू हातात घेऊन पाहण्याची, चव घेण्याची, तोंडात किंवा नाकात घालण्याची सवय असते. मोठ्या माणसांचे लक्ष नसताना मुले क्षणार्धात काहीतरी उद्योग करून ठेवतात आणि पालकांच्या चिंतेत भर पडते. एक अशीच भयानक घटना २ वर्षांच्या मुलासोबत घडली आहे. आई शेतात गेली असताना, अजाणतेपणी एका मुलाने इंजेक्शनच्या ८ सुया गिळल्या आहेत.

डॉक्टरही हादरले

पूरू या देशातील उत्तरपूर्व परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. मुलगा खेळत असतानाच त्याने मेडिकलसाठी वापरात येणाऱ्या इंजेक्शनच्या ८ सूया गिळल्या आहेत. मुलाच्या आईचे लक्ष नसतानाच ही घटना घडली आहे. दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत घडलेली ही घटना ऐकून डॉक्टरही चकित झाले. त्यांनी ताबोडतोब मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.

हेही वाचा >> मुंबईत वडिलांची कार घेऊन १४ वर्षाच्या मुलाने वृद्धास चिरडले; धक्कादायक घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद

अखेर चिमुकला बचावला

या घटनेविषयी डॉक्टर इरफान सालजार यांनी म्हटलं आहे की, आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पोटावर चीरा मारल्यानंतर आतमध्ये लोखंडासारखी काही वस्तू दिसत होती. जेव्हा डॉक्टरांनी ते बाहेर काढले तेव्हा सुई असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी एक एक करुन तब्बल आठ सुया बाहेर काढल्या आहेत, यानंतर डॉक्टरही हादरले आहेत. अखेर डॉक्टरांच्या उपचारांमुळं चिमुकल्याचा जीव वाचला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 2 year old boy who accidentally swallowed eight needles saved by doctors shockng childrens news srk