Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर आवडीने शेअर केले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये समाज प्रबोधनकार युवा व्याख्याता वसंत हंकारे एका आजीविषयी सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा हा व्हिडीओ आहे.
व्हायरल व्हिडीओ
हा व्हायरल व्हिडीओ अगदी सकाळचा आहे. या व्हिडीओमध्ये वसंत हंकारे एका आजीबरोबर चालताना दिसत आहे. आजीबरोबर चालताना ते हा व्हिडीओ बनवतात. व्हिडीओत ते सांगतात की या आजीचे वय ७५ वर्ष आहे आणि आजी रोज पाच किमी चालते. पुढे जेव्हा वसंत हंकारे आजीला विचारतो, “आजी रोज तु किती चालते?” त्यावर आजी म्हणते, “अंदाज नाही” पुढे हंकारे सांगतात, “या आजीला अंदाज नाही पण घाम फुटेपर्यंत चालते. मगापासून मी अर्धा पाऊण तास आजीला बघतोय.जवळ जवळ पाच किमी ती चालली आहे. लक्षात घ्या. आयुष्याला कारणं देता ना.. हे बघा.. म्हणून शरीर खूप महत्त्वाचं आहे. आजी या वयात धावतेय. दररोज प्रत्येकाने धावायलाच पाहिजे.”
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एवढ्या उतार वयातील आजीचा उत्साह पाहून कोणालाही प्रेरणा मिळेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
vasant_hankare555 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून वसंत हंकारे यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “75 वर्षाची आजी रोज पाच किलोमीटर चालती.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझे आजोबा पण दररोज सहा किमी चालतात” तर एका युजरने लिहिलेय, “जुनं खोंड आताच्या तरुणाईला कधी पण भारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “एवढ्या वयात एवढं चालणं नशीब म्हणायचं.” एक युजर लिहितो, “एक नंबर आजी नाहीतर हल्लीचे पोरं ९ वाजेपर्यंत गोधडीमध्येच असतात.” अनेक युजर्सनी आजीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक जण ७५ व्या वर्षी आजीची ही ऊर्जा पाहून अवाक् झाले आहेत.