Viral Video: तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची असेल किंवा एखादा छंद जोपासायचा असेल, तर त्यासाठी वय महत्त्वाचे ठरत नाही. साठी उलटल्यानंतर एखादा कोर्स करणे, व्यायाम करणे असो, डान्स करणे असो किंवा एखादा छंद जोपासायचा असो; त्याला वयाचे बंधन नसते. याचा प्रत्यय अनेकदा अनेकांच्या कलाविष्कारातून दिसून येतो. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ९५ वर्षीय आजीने त्यांचे उल्लेखनीय नृत्यकौशल्य दाखवले आहे; जे अनेकांना थक्क करून सोडत आहे.

आयआरएएस (IRAS) अनंत रूपनागुडी यांनी एक्स (ट्विटर)वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तमिळनाडूमध्ये “विश्रांती होम फॉर द एज्ड’ म्हणजेच एका वृद्धाश्रमात कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या कार्यक्रमादरम्यान ९५ वर्षीय आजींनी ‘ओह रसिककुम सीमा’ या तमीळ गाण्यावर नृत्य सादर केले. ९५ वर्षीय आजी १९४० च्या दशकात कलाक्षेत्र फाउंडेशनच्या विद्यार्थिनी होत्या. तसेच त्यांनी चंद्रलेखा (१९४८)सारख्या चित्रपटामध्ये नृत्यसुद्धा केले आहे, असे रूपनागुडी यांनी सांगितले आहे. ९५ वर्षीय आजीने सादर केलेलं नृत्य तुम्हीसुद्धा बघा.

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
group of women amazing dance on famous song Dilat Zapuk Zupuk vajta rahtay
“दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा…जुळून आल्या रेशीमगाठी! डेटिंग, मेट्रिमोनिअल साईट नव्हे ‘या’ ॲपद्वारे भेटले ते दोघे; पाहा प्रियकर-प्रेयसीची ही गोष्ट

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ९४ वर्षीय आजी निळ्या-पिवळ्या रंगाची साडी नेसून नृत्य सादर करते आहे. विश्रांती होम फॉर द एज्ड म्हणजेच वृद्धाश्रमात येथे ‘ओह रसिककुम सीमा’ या तमीळ गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली. व्हिडीओतील आजींनी सादर केलेल्या नृत्यातील स्टेप्स, पाऊलखुणा, हावभाव, ‘सादगी’ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. तमीळ गाण्यावर आजींनी सादर केलेलं हे नृत्य पाहून तुम्हीसुद्धा मोहात पडाल आणि हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहाल एवढं नक्की.

सोशल मीडियावर आजींचं कौशल्य दाखविणारा हा व्हिडीओ आयआरएएस (IRAS) अनंत रूपनागुडी यांनी त्यांच्या @Ananth_IRAS एक्स (ट्विटर) अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. सुंदर आणि कुशल कामगिरी दाखविणाऱ्या या हृदयस्पर्शी व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकऱ्यांनीदेखील व्हिडीओवर आश्चर्य आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरनं कमेंट केली आहे, “नवीन पिढीसाठी एक शिक्षक म्हणून तुम्ही चांगले योगदान देऊ शकता” आदी कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.