आज कालची पिढी ही बॉलिवूड चित्रपट पाहत मोठी झाली आहे त्यामुळे बॉलिवूडमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचे आकर्षण असते. बॉलिवूड चित्रपटांमध्ये हिरो हिरोईनला अगदी फिल्मीस्टाइलमध्ये प्रपोज करताना पाहून आपण लहानाचे मोठे झाला. प्रत्येकाच्या मनात इच्छा तयार होते की आपल्याला ही कोणीतरी असं फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज करावे. हे स्वप्नवत वाटणारी गोष्टी एक तरुणीबरोबर प्रत्यक्षात घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही ‘जाने तू या जाने ना’ चित्रपट पाहिला असेल ना. त्यामध्ये जय म्हणजेच अभिनेता इम्रान खान जो अदिती म्हणजेच जिनियाला चित्रपटामध्ये एअरपोर्टवर जाऊन प्रपोज करतो. हा चित्रपट सर्वांचा आवडता चित्रपट आहे आणि एअरपोर्ट प्रपोजलपैकी सर्वांच आवडतं आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक एअरपोर्ट प्रपोजल तुम्ही पाहिले असेल पण सध्या खऱ्या खुऱ्या एअरपोर्ट प्रपोजलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा अतिशय सुंदर व्हिडिओमध्ये एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला एअरपोर्टवर प्रपोज केले आहे. विमानतळाच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यशराज छाबरा नावाच्या व्यक्तीने त्याची गर्लफ्रेंड रिया शुक्ला हिला ऑकलंड विमानतळावर प्रपोज केले. या घटनेचा व्हिडिओ ऑकलंड एअरपोर्टने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा – चक्क सायकल घेऊन तरुणाने केला पुणे मेट्रोमध्ये प्रवास, व्हायरल होतोय व्हिडीओ

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एअरपोर्टवर प्रवाशांच्या गर्दीमध्ये यशराज कसा फिल्मी स्टाइलमध्ये गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करत आहेत. व्हिडीओ शेअर करताना ऑकलंड विमानतळाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे की, ऑकलंडच्या हवेत प्रेमाचा गंध पसरला आहे. रिया आणि यशराज यांचे मनःपूर्वक आभार. या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

हेही वाचा – पुण्यातील रस्त्यावरच्या खड्ड्यांना हार घालून श्रद्धांजली देतोय ‘हा’ व्यक्ती? पाहा व्हायरल व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, यशराज ऑकलंडमध्ये बँकिंग तज्ज्ञ आहेत. त्याला आपल्या गर्लफ्रेंडसाठी काहीतरी खास करायचं होतं, जे संस्मरणीय असेल. ऑकलंड विमानतळावर त्याने गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करून त्याने जोडप्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. दोघांनाही लोक सोशल मीडियावर लोक शुभेच्छा देत आहेत.

Story img Loader