Viral Video : आई आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. आईच्या प्रेमाची तुलना आपण कोणाबरोबरही करू शकत नाही. ती नेहमी मुलांच्या सुख दु:खात हजर राहते. जेव्हा मुलांचे लग्न होते आणि ते एका नव्या आयुष्याची सुरुवात करतात तेव्हा आईसाठी हा एक अविस्मरणीय क्षण असतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलाच्या लग्नात मनसोक्त नाचणाऱ्या आईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आई खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. दोन लोकं एका नव्या आयुष्याची सुरुवात करतात. या खास क्षणी नवरी नवरदेवासह त्यांच्या कुटूंबातील सदस्यही खूप आनंदी असतात. या व्हिडीओमध्ये सुद्धा मुलाच्या लग्नात डान्स करणाऱ्या हौशी आईचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. डान्स करताना आईचा आनंद गगनात मावेनासा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरदेवाची वरात दिसेल. या वरातील अनेक लोकं डान्स करताना दिसत आहे पण एका महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या महिलेने पांढरा क्रिम रंगाचा सुंदर लेहेंगा घातला आहे. ती महिला चक्क नवदेवाची आई आहे. ती इतकी सुंदर दिसते आहे की तिला पाहून तुम्हाला तिच्या वयाचा अंदाज येणार नाही. ती लोकप्रिय महबूबा महबूबा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ती स्टार सारखी समोर डान्स करत आहे आणि इतर मागे उभ्या असलेल्या महिला तिला पाहून तिच्यासारख्याच डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून काही लोकांना एखाद्या अभिनेत्रीची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यावा, हे तुम्हाला या व्हिडीओतून दिसून येईल.

हेही वाचा : Video : ‘पापा की परी’नी घराच्या छतावर चढवली स्कुटी, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

the_knot_wedding या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलाच्या वरातील डान्स करायची आईची इच्छा होती… आईचा डान्स” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सुंदर सासूबाई.. सुनेबरोबर सुद्धा असाच डान्स करशील” तर एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक मुलीला अशी सासू भेटावी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A beautiful mother dance in sons wedding on mahbuba mahbuba song video goes viral on social media ndj