शाळा ही प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कितीही छोटी असली, कितीही दूर असली तरी प्रत्येकाला आपली शाळा आवडते. पण सध्या एका आगळ्या वेगळ्या शाळेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका शाळेच्या भिंतीवर एक सुंदर चित्र रेखाटले आहे जे पाहून तुम्हालाही या शाळेत जाण्याचा मोह होईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे चित्र पाहून एखाद्याला वाटेल की ही एसटी बस आहे की काय पण हे फक्त लालपरीचे म्हणजेच एसटी बसचे चित्र रेखाटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एवढी सुंदर शाळा कधीही पाहिली नसेल?

व्हायरल व्हिडीओमधील शाळेच्या भिंतीवर लालपरीचे चित्र रेखाटले आहे. शाळेच्या एका भिंतीवर एसटी बसची काच असलेली समोरील बाजू रेखाटली आहे तर शेजारच्या भिंतीवर एसटीच्या खिडक्या दिसणारी बाजू रेखाटली आहे. भिंतीवरील खिडक्यांचा वापर करून एसटी बसच्या चित्रातील खिडक्या रेखाटल्या आहेत. तसेच बसचे चाकही दाखवले आहे. एसटी महामंडाळाचा लोगो देखील बसवर दिसत आहे. लालपरीच्या समोरील बाजूला एसटीबसप्रमाणेच ती कोणत्या गावाला जात आहे हे दर्शवणारी पाटी लावली आहे. ज्यावर कोंदे रंकाळा असे लिहिले आहे. त्यानंतर मराठी आणि इंग्रजीमध्ये एसटी बसचा नंबरही लिहिला आहे. व्हायरल व्हिडीओमधील ही शाळा नेटकऱ्यांना प्रचंड आवडली आहे. अनेकांही ही शाळा कोणत्या गावात आहे असा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा – “जिंकलंस भावा!”, ‘मुकाबला मुकाबला’ गाण्यावर अफालतून नाचतेय ‘ही’ व्यक्ती! थेट प्रभु देवाला दिली टक्कर

शाळेच्या भिंतीवर रेखाटली लालपरी

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” असंडोली, गगनबावडा याठिकाणी रेखाटण्यात आलेली ही लाल परीची कलाकृती. खरचं खुप छान उपक्रम आहे. हे चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचे व ही संकल्पना सुचवणाऱ्याचे खरचं मनापासून कौतुक व अभिनंदन ” तसेच अशी शाळा असेल तर कोणाला आवडणार नाही असा मजकूर देखील व्हिडीओवर लिहिलेला दिसत आहे.

हेही वाचा – आधी दोरखंडाने महकाय मगरीचा जबडा बाधंला मग ८ जणांनी मिळून केलं असं काही की…; रेस्क्यूचा थरारक VIDEO पाहून झोप उडेल

नेटकऱ्यांना आवडली शाळा

व्हिडीओवर कमेंट करून अनेकांनी शाळेवर लालपरीचे चित्र रेखाटणाऱ्यांचे कौतुक केले आहे.
व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले, “कलाकराला मानाचा मुजरा”

दुसरा म्हणाला, कमाल,. कलाकाराला प्रणाम, अप्रतिम!

तिसरा म्हणाला, खूप सुंदर चित्र आहे हो!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A beautiful picture of lal pari st bus painted on the school wall netizens love it video viral snk