सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत होता. एका मुलाने भीक मागून कमावेले आपले पैसे सिग्नलला उभ्या असलेल्या गाडीतील व्यक्तीला देऊ केले. असे नेमके काय घडले होते की त्याने आपली कमाई देऊ केली याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल. पण त्याची गोष्ट ऐकून तुम्हालाही नक्कीच त्याचे कौतुक वाटेल.

व्हायरल झालेला हा फोटो नैरोबीच्या रस्त्यावरचा आहे. या सिग्नलपाशी जॉन नावाचा मुलगा भीक मागून कसे बसे आपले दिवस ढकलतो. जेव्हा नेहमीप्रमाणे जॉन भीक मागण्यासाठी एका गाडीपाशी गेला तेव्हा गाडीतील रुग्णाला पाहून त्याने आपले सारी कमाई गाडीतल्या महिलेला देऊ केली. एका इंग्रजी वेबसाईटनुसार नैरोबीत राहणारी ग्लाडिस नावाची एक महिला एका आजाराने त्रस्त आहे. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांनी सांगितले होते पण तिच्याकडे या शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसे नव्हते. म्हणूनच तिच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची मदत गोळा करण्याचे काम तिचा मित्रपरिवार करत आहे. तिला एका गाडीतून ते फिरवत आहे आणि ठिकठिकाणून मदत गोळा करत आहेत. जेव्हा त्यांची गाडी एका सिग्नलपाशी आली तेव्हा जॉन नेहमीप्रमाणे या गाडीपाशी भीक मागायला गेला. पण शरीरावर विविध उपकरणे लावेली आजारी महिला पाहून त्याने तिच्याबद्दल चौकशी. तिचीही हा हालत जॉनला बघवली नाही तिला पाहून तो भावूक झाला आणि आपल्याकडे असलेले होते नव्हते तेवढे पैसे त्याने तिला दिले.

तिने लवकर बरं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थनाही केली. खरं तर अनेकदा आपण पैसे असूनही गरजूंना मदत करत नाही, त्यातून रस्त्यावर एखादा भिकारी दिसला की त्याच्याकडे तोंड फिरवून आपण चालू लागतो. पण जॉनसारख्या छोट्या मुलाने मात्र आपली कमाई आजारी महिलेला देऊन टाकली. खरं तर रोज भीक मागून पोट भरणारा जगासाठी तो एक भिकारी, पण मनाने मात्र तो भिकारी नक्कीच नव्हता आपली कामाई एका अनोळखी महिलेला देऊन त्याने मनाची श्रीमंती जगाला दाखवून दिली.

Story img Loader