जंगलातून जाणा-या रस्त्यावरून वाहनं चालवताना चालकाला कधी काय अनुभव येतील सांगता येत नाही. तेव्हा इथे वाहनं सावकाश चालवलेली बरी अन्यथा या बायकरला आलेला अनुभव तुम्हाला आल्यावाचून राहणार नाही. व्हर्जिनियातला हा व्हिडिओ आहे. जंगलातून जाणा-या महामार्गावरून काही बायकर्स जात होते याचवेळी अनपेक्षितरित्या मोठा रेनडिअर जंगलातून धावत बाहेर आला आणि वेगाने येणा-या एका चालकाच्या डोक्यावरून उडी मारून पुन्हा जंगलात पळाला.
हा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकला नाही तर नवलंच. अगदी अनपेक्षितरित्या रेनडिअर समोर आलेला पाहून चालकाचाही तोल गेला आणि अपघात घडला, पण सुदैवाने त्याला काही किरकोळ जखमा तेवढ्या झाल्या. मागून येणा-या चालकांनी मदत करत या चालकाला सावरले. तसा हा २०१५ चा व्हिडिओ आहे पण सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. रात्रीच्यावेळी एका महिला चालकाने रेनडिअरला धडक दिली होती, तिने पुढे जाऊन गाडी थांबवली असता या रेनडिअनरने येऊन तिच्यावर आपल्या शिंगांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण महिलेने त्याला कसेबसे अडवले होते.