लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. आपलं लग्न चांगले आणि धुमधडाक्यात व्हावे अशी इच्छा प्रत्येकाची असते. त्यासाठी अनेकजण लग्नात वारेमाप पैसा खर्च करतात. मग ते लग्न सर्वसामान्य कुटुंबातील असो वा मोठ्या उद्योगपतींच्या, पैसे खर्च करण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही. सध्या सोशल मीडियावर उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरु आहे.

अशातच आता आणखी एका साखरपुड्यातील भन्नाट असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल यात शंका नाही. सध्या सोशल मीडियावर लग्नासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये कधी नवरा नवरीने लग्नाच्या स्टेजवर केलेली ग्रँड एन्ट्री, तर कधी नवरदेवाच्या मित्रांनी केलेले भन्नाट डान्स असे अनेक व्हिडीओ असतात. मात्र, सध्या एका साखरपुड्यातील रिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल, शिवाय या व्हिडिओमध्ये दिसणारी रिंग इतकी मोठी का आहे ? ते तुम्हाला पुर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतरच कळेल.

swara bhasker fahad ahmad trolled
स्वरा भास्करच्या नवऱ्यानं सुप्रिया सुळेंसाठी छत्री धरली; सोशल मीडियावर नवरा-बायको दोघंही ट्रोल
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Ratan Tata Death News in Marathi
Ratan Tata : “मग कुत्रे कुठे जातील?”, बॉम्बे हाऊसच्या नुतनीकरणावेळी रतन टाटांना चिंता; एन. चंद्रशेखर यांनी शेअर केली जिव्हाळ्याची आठवण!
How much power does Noel Tata head of Tata Trusts have What are the challenges
नोएल टाटा आता टाटा न्यासांचे प्रमुख… त्यांच्याकडे किती अधिकार? आव्हाने कोणती?
viscose fabric
विश्लेषण: ‘विस्कोस’ कापड खरेच पर्यावरणपूरक असते का? पर्यावरणवाद्यांकडून वेगळेच निष्कर्ष?
Hospital for animals set up by Mumbai Municipal Corporation in collaboration with Tata Trust Mumbai news
प्राण्यांसाठीच्या रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण, पण उद्घाटन राहिले…; मुंबई महापालिकेने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभारले रुग्णालय
Ratan Tatas significant investments helped startups to stand on thier own feet
स्टार्ट-अप्ससाठी रतन टाटा नेहमीच कसे ठरले ‘देवदूत’?
Rohit Sharma Suryakumar Yadav Post on Ratan Tata Death Cricketing World Mourn on Tata Demise
Ratan Tata Death: “इतरांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी जगलात…”, रोहित शर्माची रतन टाटांसाठी भावुक करणारी पोस्ट; सूर्यकुमार यादवनेही व्यक्त केली कृतज्ञता

हेही पाहा- Video: ४० वर्षे नाद केला पण वाया नाय गेला! ८८ व्या वर्षी आजोबांचं नशीब पालटलं, जिंकली ५ कोटींची लॉटरी

व्हायरल होत असलेल्या या भल्यामोठ्या रिंगचा व्हिडीओ viralbhayani नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘व्वा! रिंग सेरेमनीच्या रिंगची काय एंट्री आहे’ व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक शानदार असा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु असल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- Netflix कडून ३ कोटीच्या पॅकेजची मोठी जॉब ऑफर; तुम्हीही करु शकता अर्ज, पाहा काय आहे काम?

हा कार्यक्रम सुरु असताना एका इलेक्ट्रीक गाड्यावरुन भलीमोठी रिंग आल्याचं दिसत आहे. या रिंगच्या दोन्ही बाजूला साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे लोक त्या रिंगकडे आश्चर्यचकित होऊन पाहत असल्याचं दिसत आहे. शेवटी ही रिंग स्टेजजवळ आल्यानंतर स्टेजवरील जोडपे या मोठ्या रिंगच्या वरच्या भागात असणारी लहान रिंग काढून घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायपल होत असून तो आतापर्यंत ६२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.