Viral Video : पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आजार व कोणत्याही रोगाचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छता अत्यंत गरजेची आहे. स्वच्छतेचे पालन करताना कचरा व्यवस्थापन करणेही तितकेच गरजेचे आहे. घरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील कचरा हा कचरा पेटीत टाकणे, ही आपली जबाबदारी आहे.
अनेकदा स्वच्छता अभियान राबवून आणि कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करूनही काही लोक कचरा पेटीत कचरा टाकत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पक्षी कचरा पेटीत कचरा टाकताना दिसत आहे.
पक्ष्यांनाही कचरा कुठे टाकावा, हे कळतं; पण माणसांना ते कधी कळणार, असा प्रश्न युजर्स विचारत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
हेही वाचा : चिमुकलीने सांगितला सरनेमचा खरा अर्थ; ऐकून तुम्हीही हसाल पोट धरून
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एक पक्षी चोचीत प्लास्टिक बाटली घेऊन उडत कचरा पेटीजवळ येतो. तेव्हा आजूबाजूचे लोक या पक्ष्याकडे बघत असतात. हळूच हा पक्षी कचरा पेटीवर बसतो आणि चोचीतून आणलेली बाटली कचरा पेटीत टाकून निघून जातो.
profprashantmhetre या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पक्ष्यांनाही कळतंय कचरा कुठे टाकावा. आपण समजूनपण न समजल्यासारखं करणार?” स्वच्छतेचे पालन न करणाऱ्या लोकांचे डोळे उघडणारा हा व्हिडीओ आहे.
हेही वाचा : खेळता खेळता स्विमिंग पूलमध्ये पडली चिमुकली, धक्कादायक व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
त्यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिलेय, “प्राणी माणसापेक्षा जास्त हुशार होताना दिसतोय.” तर एका युजरने लिहिलेय, “पक्ष्यांना अक्कल आली; माणसांना कधी येणार?” आणखी एका युजरने लिहिलेय, “पक्ष्यांंएवढीही लायकी नाही आपली.”