Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो तर कधी कोणी डान्स करताना दिसतो. काही लोक तर त्यांचे अनुभव सुद्धा सोशल मीडियावर शेअर करतात किंवा आजुबाजूला घडणाऱ्या घटना सुद्धा कॅमेऱ्यात कैद करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सुंदर आवाजात गाणं गाताना दिसत आहे. त्याचा आवाज ऐकून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
सुंदर आवाजात गायलं गाणं
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक जोडपे दिसेल. महिला खाली बसली आहे तर पुरुष सुंदर आवाजात गाणी सादर करत आहे. पोटा पाण्यासाठी स्वत:मध्ये असलेली कला सादर करत आहे. या माणसाचा आवाज इतका सुंदर आहे की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ‘क्या हूआ तेरा वादा’ हे लोकप्रिय हिंदी गाणं गाताना दिसत आहे. हे दोघेही पती पत्नी अंध आहेत आणि गाणी म्हणत, कला सादर करत ते स्वत:चे पोट भरतात. काही लोकांना यांना आर्थिक मदत करावी, असे वाटेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “भीक मागून पोट भरण्यापेक्षा स्वत:तली कला दाखवून पोट भरणे कधीही श्रेष्ठ. एक नंबर भावा.”
पाहा व्हायरल व्हिडीओ
marathi_memer_2.0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सर्वांनी यांच्या कलेला फॉरवर्ड करू या. भावा छान आवाज आहे. तुझा स्कॅनर पाठव माझ्याकडून छोटीशी मदत होईल.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप खूप भारी दादा तुम्ही अणि तुमचा आवाज पण खुप आवडला” आणखी एका युजरने लिहिलेय, “दोघे पण नवरा बायको अंध आहेत, भरभरून मदत करा. मागच्या वर्षी हे गडचिरोली ला आले होते तेंव्हा मी मदत केली.” एक युजर लिहितो, “खूप मस्त आवाज आहे तुमचा दादा…” तर दुसरा युजर लिहितो, “खरच खुपचं छान दादा ! समाजात असे कित्येक लोक खुप टॅलेंटेड आहेत, पण फक्त परिस्थिती आणि मजबुरीमुळे असे व्यक्ती मागे राहतात.
अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर करत या कलाकारावर कौतुकाचा वर्षाव केला आहेत.