Train Accident Video :रेल्वे प्रवास हा जितका सोयीस्कर आहे तितकाच जीव धोक्यात टाकणार आहे. आपली एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते हे माहित असूनही अनेकदा लोक धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करतात.धावती रेल्वे पकडताना किंवा रेल्वेतून उतरताना झालेल्या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. व्हिडीओमध्ये एक धावत धावत रेल्वेच्या डब्यामधून एक व्यक्ती उतरत असताना त्याचा तोल जातो. तिथेच एक तरुण रिल व्हिडिओ शुट करत उभा असतो, पुढे जे घडले ते पाहून लोक थक्क झाले आहेत.
रिलच्या नादात चक्क तरुणाने वाचवला वृद्धाचा जीव
सार्वजनिक ठिकाणी डान्स करण्यास मनाई असूनही रेल्वे आणि मेट्रोमध्ये रोज कोणी ना कोणी डान्स करताना दिसते. रेल्वे स्टेशनवर डान्स करणे अत्यंत धोकादायक आहे पण नुकत्याच घडलेल्या घडनेत रेल्वे स्टेशनवर डान्स करणाऱ्या तरुणामुळे एका वृद्धाचा जीव वाचला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता एक वृद्ध धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत आहे दरम्यान, त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो पण तेवढ्यात तिथेच डान्स करत असलेला तरुण त्यांना पकडतो आणि मोठा अनर्थ टळतो. रिलच्या नादात अपघात झाल्याने अनेक व्हिडिओ पाहिले असतील पण पहिल्यांदाच रिलच्या नादात एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. व्हिडिओ पाहून वाचवणारा कोणत्या रुपात येईल हे सांगता येत नाही अशी नेटकरी प्रतिक्रिया व्यक्त करत आहे.
हेही वाचा – पुणेकरांचा नाद करायचा नाही! ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला घडवली अद्दल, Video होतोय Viral
येथे पाहा Viral Video
व्हिडिओ lay_bhari_official नावाच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “देव तारी त्याला कोण मारी”
व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, “देवाला सुद्धा काळजी असते”
तर काही नेटकऱ्यांनी त्या तरुणामुळेच तो वृद्ध व्यक्ती पडला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.