Gautami patil dance lavani ‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने लावणी डान्सर गौतमी पाटीलला अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. गौतमी पाटील हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.गौतमी पाटील ही लावणीसम्राज्ञी सध्या चांगलीच चर्चेत असून अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे. नृत्याची आवड जपत गौतमीने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. गौतमी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर आता बाहेरच्या देशामध्येही गौतमीची क्रेझ पाहायला मिळत आहे. चक्क इंग्लडमध्ये एका भारतीय तरुणानं गौतमीच्या लावणीवर डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, युकेमध्ये हा तरुण गौतमी पाटीलच्या लावणीवर डान्स करत आहे. तसेच तो गौतमी सारख्या डान्स स्टेप्स करण्याचाही प्रयत्न करत आहे. त्याच्या आजूबाजूला आणखी काही तरुण आणि तरुणी आहेत. ते सगळे या तरुणाला दाद देत आहेत. हा तरुणही गाण्यावर चांगलाच ठेका धरताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही गौतमी पाटीलला टॅग करत नादच लई डेंजर असं लिहलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: भाईचा जबरा फॅन! सलमान खानकडून घेत होता केस कापून; सांगितली “तेरे नाम”वाली हेअरस्टाईल, मात्र भाईनी काय केलं पाहा

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @mindscapezz या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

Story img Loader