अनेक लोकांमध्ये भरपूर कौशल्य असते पण त्यांना ते सादर करण्याची योग्य संधी मिळत नाही. सोशल मीडियामुळे आपले कौशल्य सादर करण्याची संधी आता प्रत्येक व्यक्तीला मिळाली आहे. सोशल मीडियाव कित्येक लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यात कोणी उत्तम गाणे गाते तर कोणी उत्तम डान्स करते. सध्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत ज्यामध्ये त्याने जबरदस्त डान्स केला आहे. विशेष म्हणजे तरुणाने ‘बेली डान्स’ सादर केला आहे जो पाहून लोक थक्क झाले आहेत.
या तरुणाने चक्क मुलींसारखे स्कर्ट परिधान करून ‘बेली डान्स’ सादर केला आहे. त्याचा डान्स लोकांना प्रचंड आवडला आहे. तरुणाच्या डान्सची अनेकांनी अभिनेत्री आणि नृत्यांगणा नोरा फतेहीसह तुलना केली आहे.
हेही वाचा – तुम्ही आग्राचा प्रसिद्ध पेठा कधी खाल्लाय का? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल उलटी, पुन्हा आयुष्यात कधीही खाणार नाही
व्हायरल व्हिडीओ पाहून लोक या तरुणाचे चाहते झाले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक मुलगा मुलीसारखे कपडे परिधान करून जबरदस्त “बेली डान्स करत आहेत. लोकांनी तरुणाच्या डान्स कौशल्याचे कौतूक केले आहे.
हेही वाचा – कधीही पाहिली नसेल अशी फॅशन! बाजारात आले आता नागिन शूज, Viral Video पाहून बसेल धक्का
व्हायरल व्हिडीओ desi mojito ?? (@desimojito) नावाच्या अकांउटवर १६ ऑक्टोबरला शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “कोण नोरा फतेही?” व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की,”खूप चांगला डान्स केला , नोरा फत्तेहीला टक्कर देत आहे.” तर आणखी एकाने लिहिले की, “याच्या डान्ससमोर कोणीही टिकू शकत नाही” आहेत.