Viral Video : आपण सहसा खेळताना एका बॉलनी खेळतो, पण तुम्ही कधी पाच बॉल एकाचवेळी खेळले आहात? तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? पण, हे एका तरुणाने करून दाखवलं आहे. हा तरुण एकाचवेळी पाच बॉलबरोबर खेळताना दिसत आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एक तरुण रेल्वेस्थानकावर बसला आहे आणि हातांच्या आणि पायांच्या बोटांवर एकाच वेळी पाच बॉलची कसरत दाखवत आहे. या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे हा तरुण शुजच्या टोकावर दोन बॉल, हातांच्या बोटांवर दोन बॉल आणि तोंडात पेन घालून पेनाच्या टोकावर एक बॉल फिरवताना दिसत आहे. ही कसरत पाहून स्थानकावरील लोक अवाक् झाले आहेत. काही लोक या तरुणाचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे.
हेही वाचा :प्रेम म्हणजे प्रेम असतं! डोळ्यावर पट्टी बांधलेली असतानाही ओळखलं बायकोला
इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. युजर्सनी या तरुणाच्या टॅलेंटचे कौतुक करत कमेन्ट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले आहे, “खूप छान, अप्रतिम”, तर आणखी एका युजरने लिहिले आहे, “भारतात अशा टॅलेंटची कमी नाही. अशा टॅलेंटेड लोकांना फक्त समोर आणण्याची गरज आहे.”