Viral Video : “तुझ्यासाठी चंद्र-तारेही तोडून आणू शकते,” असे फिल्मी डायलॉग तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकले असतील किंवा वाचले असेल पण सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलाने चंद्र तोडून नाही तर हाताने साकारला आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
व्हिडीओत तुम्हाला दिसेल एक मुलगा घराच्या छपरावर चित्र काढताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला आपल्याला मुलगा काय करतोय, हे समजत नाही पण नंतर तो चंद्राचे सुंदर चित्र काढतो. सध्या हाताने साकारलेला हा चंद्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
हेही वाचा : अंघोळ करताना गाणं गायलं म्हणून होस्टेलच्या विद्यार्थीनीला शिक्षा, विचित्र घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का
हा व्हिडीओ @ShubhangiUmaria नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “चंद्र तोडून वगैरे नाही…अख्खा चंद्रच घेऊन आलो आहे तर… आता फक्त तारे बाकी आहेत…”
या व्हिडीओवर काही युजर्सनी चंद्राचे चित्र साकारणाऱ्या मुलाचे कौतुक केले आहे. एक युजर लिहितो, “खूप छान बनविले आहेस, ताऱ्याची गरज आहे असे वाटत नाही.”