Viral Video : लहान मुलं नेहमीच आई-बाबांची नक्कल करताना दिसून येतात. आई-बाबा ऑफिसला कोणत्या प्रकारचे कपडे घालून जातात, कशा पद्धतीने चालतात, कसं बोलतात आदी सगळ्या गोष्टींवर लहान मुलं बारकाईनं लक्ष ठेवतात आणि त्यांची हुबेहूब नक्कल करून दाखवतात. तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका मुलानं आईसारखं दिसण्यासाठी स्त्रीची वेशभूषा केली आहे; जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हा मुलगा स्त्री वेशात तयार होऊन आला आहे. आईसारखं दिसण्यासाठी तरुण मुलगा हुडी, निळी जीन्स, मोठे कानातले व बॅग घेऊन उभा आहे. तरुण अगदीच आईसारखी केसांची स्टाईल करून, हुबेहूब चालताना तुम्हाला व्हिडीओत दिसून येईल. अगदी कपडे घालण्यापासून ते चालण्याची पद्धत इथपर्यंत या तरुणानं आईची हुबेहूब नक्कल केली आहे. तसेच आईचा आयडी वापरण्यासाठी मुलानं असं हुबेहूब वेशांतर केलं आहे, असं आईनं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. तरुण मुलगा आईसारखा हूबेहूब कसा तयार झाला हे एकदा व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघाच….
हेही वाचा… महेंद्रसिंग धोनीनं जबरा फॅनला दुचाकीवर दिली लिफ्ट, व्हायरल व्हिडीओनं जिंकली क्रिकेटप्रेमींची मनं
व्हिडीओ नक्की बघा :
आईसारखं दिसण्यासाठी घेतली मेहनत :
घरातील लहान मुलांचा स्वभाव किंवा त्यांची एखादी सवय कुटुंबातील एखाद्या सदस्यासारखी असली की, तू तर अगदी आई किंवा बाबांसारखा आहेस, असं आपण लगेच म्हणतो. पण, इथे तर आईसारखं दिसण्यासाठी मुलानं खूपच मेहनत घेतलेली दिसून येत आहे. बनावट स्वाक्षरी करण्यापासून ते फोनवर आईसारखा आवाज काढण्यापर्यंत त्यानं भरपूर सराव केला. नकली केस आणि मेकअपच्या मदतीनं तो हुबेहूब आईसारखा दिसू लागला. आईसारखं दिसावं म्हणून मुलानं प्रत्येक छोट्या गोष्टीची बारकाईनं काळजी घेतली आहे, असं सांगण्यात येत आहे. मुलानं आईचा आयडी वापरण्यासाठी, आईप्रमाणे कपडे घालण्याचा निर्णय घेतला आणि आईची हुबेहूब नक्कल करण्यात तो यशस्वी झाला. मुलाचं वेशांतर पाहून, आपण स्वतःच्या जुळ्या बहिणीलाच बघतोय, असं आईला वाटलं, असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
‘मोनिक मेझा’ असं या आईचं नाव आहे. आईनं हा मजेशीर व्हिडीओ @monique meza तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे; ज्यामध्ये मुलगा तुम्हाला आईच्या वेशभूषेमध्ये दिसेल. व्हिडीओ बघणारे अनेक जण आईसारखं हुबेहूब वेशांतर केलेलं पाहून मजेशीर प्रतिक्रिया देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत