Viral Video : सध्या देशभरामध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. सोशल मीडियावरही अनेक युजर्स गणपतीचे फोटो, व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. गणपतीवरील गाणे, आरत्या आणि डान्सचे अनेक व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
अशात एका युजरने तर चक्क गुळापासून शिव-पार्वती आणि गणरायाचं चित्र रेखाटलंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
गणेशोत्सव हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा सण आहे. त्यामुळे देशभरात गणेशोत्सवादरम्यान उत्साह पाहायला मिळतो. यानिमित्त एका कलाकाराने गुळापासून बनविलेले हे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक तरुण हातात गुळ घेतो आणि चाकुने गुळाचे लहान तुकडे करतो. हे तुकडे तो मिक्सरमध्ये बारीक करतो आणि पांढऱ्या कागदावर गुळापासून शिव-पार्वती आणि गणरायाचं सुरेख चित्र रेखाटतो. या कलाकाराची कला पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल.
mahi_artist__ या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून महेश कापसे असे या चित्र काढणाऱ्या तरुण कलाकाराचे नाव आहे. त्याच्या या अनोख्या कलेवर युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
एका युजरने लिहिलेय, “गुळाचा गणपती… खूपच सुंदर”; तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम”, आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह, याला म्हणतात कला…”