Viral Video: महिला अत्याचाराच्या अनेक घटना दर दिवशी समोर येतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन कडक पाऊल उचलत आहे तरीसुद्धा महिला असुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा भररस्त्यात एका मुलीची छेड काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.

Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
Funny video Drunk man doing dance at a haladi ceremony funny video viral social media
देशी दारु अशी चढली की…हळदीला भर मांडवात काकांनी काय केलं पाहा; कोकणतल्या हळदीचा Video पाहून पोट धरुन हसाल
scooter caught fire man urinated on it crazy video viral on social media
त्याने पॅंटची चेन उघडली अन्…, स्कूटरने पेट घेताच तरुणांनी काय केलं पाहा, VIDEO पाहून कपाळावर माराल हात

कॅमेरामॅन तरुणाने घडवली चांगलीच अद्दल

हा व्हायरल व्हिडीओ एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की एक मुलगी हातात सायकल धरुन रस्त्याने जात आहे. एक मुलगा बाईक चालवत तिला रस्त्यात थांबवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर हा मुलगा त्या मुलीचा हात पकडतो. ही मुलगी जेव्हा त्याचा हात झटकते तेव्हा तो तिचा रस्ता अडवतो. कॅमेऱ्यामॅन तरुण हे सर्व त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत त्या मुलाजवळ जाऊन त्याला जाब विचारतो. त्यानंतर कॅमेरामॅन त्या मुलीला विचारतो, “तु याला ओळखतेस का?” त्यावर मुलगी म्हणते, “नाही. मी यांना ओळखत नाही. खूप दिवसांपासून ते मला छेडत आहे.” त्यानंतर कॅमेरामॅन मुलीला विचारतो, तु कुठून आली?” ती सांगते, “मी अंगणवाडीतून येत आहे. मी अंगणवाडीत शिकवते.”

पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की कॅमेरामॅन तरुण त्या मुलाला विचारतो, “तु या मुलीला का त्रास देतोय” तेव्हा मुलगा म्हणतो, तुला माहीत आहे का मी कोण आहे.” तेव्हा कॅमेरामॅन म्हणतो, “कोण आहे तू?” त्यावर मुलगा सांगतो, “मी अध्यक्षाचा मुलगा आहे.” त्यानंतर कॅमेरामॅन त्या मुलीला फोन पकडण्यास सांगतो आणि त्याच्या दुचाकीची चावी घेतो व त्याला म्हणतो, “जा. वडिलांना फोन कर मी चावी देणार नाही.” कॅमेरामॅन त्या मुलीला सुद्धा रागावतो आणि म्हणतो, “तुला कळत नाही का? हात पकडल्यानंतर ओरडून तु सांगू शकत नाही का?”

हेही वाचा : VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

व्हायरल व्हिडीओ

Nandu Nair या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणत्या अध्यक्षाचा मुलगा आहे, बाहेर काढा अशा लोकांना”

हेही वाचा : “निसर्गात खेळा पण निसर्गाशी खेळू नका” एक छोटीशी चुक त्यांचा जीव गमावू शकते, किल्ले विसापूरचा VIDEO पाहून येईल अंगावर काटा

या व्हिडीओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप चांगले केले भावाने पण त्या महिलेने सुद्धा ओरडून सांगायला पाहिजे. ती काही बोलत नाही म्हणून हा तरुण फायदा उचलत असेल.” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून खरंच बरे वाटले” एक युजर लिहितो, “मला हा व्हिडीओ स्क्रिप्टेड वाटतोय.”

Story img Loader