Child Rescues From Drowning And Crocodile In River : अनेकदा चित्रपटांमध्ये तुम्ही मगरींच्या शिकारीचे थरारक सीन पाहिले असतील. अगदी असाच सीन पाहावा असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुरामुळे नदीत एक १२ वर्षाचा मुलगा अडकला आणि बुडू लागला. एकीकडे सर्वत्र पाणीच पाणी होतं आणि त्याच्या मागे एक मगर शिकारीच्या तयारीत होती. पण या मुलाने हिंमत न गमावता शेवटपर्यंत लढा दिला. मात्र, तो खूप घाबरला होता आणि अशा परिस्थितीत मगरीपासून कसं वाचायचं हे समजत नव्हतं. त्यानंतर पुढे जे घडतं ते पाहण्यासारखं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा नदीत बुडताना दिसतोय. नदीचं पाणी त्या मुलाच्या मानेपर्यंत आलेलं दिसत आहे. मुलगा मोठ्या हिंमतीने सतत त्याची मान पाण्याच्या वर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. या मुलाच्या शेजारी एक मगरही दिसत आहे. ही मगर या मुलाच्या शिकारीच्या तयारी होती. मगरीला पाहून मुलगा घाबरतो आणि रडायलाही लागतो. मगरीचं साधं नाव जरी काढलं तरी अंगावर काटा येतो. मग नदीत अडकलेलं असताना समोर मगर पाहून त्या मुलाची अवस्था काय झाली असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. पण म्हणतात ना, दैव तारी त्याला कोण मारी. अगदी याचा प्रत्यय पुढच्या काही मिनिटात आला.

आणखी वाचा : नाशिक हादरलं….मैत्रीला नकार दिला म्हणून दिवसाढवळ्या पेट्रोल पंच कर्मचारी महिलेवर केला चाकूने वार, घटनेचा VIDEO VIRAL

एककीकडे पाणीच पाणी आणि दुसरीकडे मगर अशा संकटात सापडलेल्या या मुलाच्या बचावासाठी तिथे रेस्क्यू टीम तिथे पोहोचली आणि मुलाला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. डोळ्यांच्या पापण्या लवण्याच्या आत रेस्क्यू टीम या मुलाला होडीत बसवले आणि पाण्याबाहेर काढण्यात यशस्वी झाले. आता लोक बचाव पथकाच्या शौर्याला सलाम करत आहेत.

आणखी वाचा : Dosa Printer: कधी विचार केला होता का? ‘डोसा प्रिंटर’ही येईल, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क झाले

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर IRS अधिकारी डॉ. भगीरथ चौधरी (@DrBhageerathIRS) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ‘ही खरी वीरता आहे’ असं कॅप्शनमध्ये लिहून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ चंबळ नदी परिसरातला असून लोक हा व्हिडीओ पाहून रेस्क्यू टीमचं कौतूक करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : हे रबराचं कोणतंही खेळणं नव्हे, तर खराखुरा मंदारिन बदक आहे, VIRAL VIDEO पाहून प्रसन्न व्हाल!

अनिल ठाकूर नावाच्या यूजरने म्हटले की, “अतिशय धाडसी कृत्य! मृत्यूला सामोरे जाताना आणि आपल्या जीवाची चिंता न करता, भयंकर मगरींपासून मुलाला वाचवणे हे धाडसाचे कृत्य आहे. या जीवनरक्षक टीमला सलाम!” बीपीएस चौहान नावाच्या दुसर्‍या यूजरने सांगितले की, “सिनेमातला सीन पाहावा असं दृश्य…सैनिक, बचाव पथक इत्यादी असे धाडस करू शकतात.” पी. देवेंद्र कटारा नावाच्या दुसर्‍या यूजरने सांगितले की, “कोणता व्हिडीओ आहे, हे खूप कौतुकास्पद काम आहे जय हिंद!”

आणखी वाचा : कोरियन आईने मुलाला भारतीय राष्ट्रगीत शिकवले, गोंडस मुलाने कसं गायलं “जन-गण-मन…”, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लंडनमध्ये ‘बैलपोळा’! ब्रिटनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सुनक यांनी पत्नीसोबत केले गोपूजन

लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहत असून तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. या व्हिडीओला ३ लाख ४८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर १५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

Story img Loader