Viral Video : “लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो” हे गाणं तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण सद्या या गाण्याचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे की पाहून तुम्हालाही अश्रु आवरणार नाही. आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या एका तरुणाने हॉस्पिटलमध्ये हे गीत गायले आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ जुना आहे पण सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर बसलेला एक तरुण मुलगा दिसेल. त्याच्या हातात गिटार आहे आणि हे गिटार वाजवत तो त्याच्या सुंदर आवाजात “लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो…” हे लोकप्रिय गीत गाताना दिसत आहे. त्याच्या बेडच्या शेजारी डॉक्टर आणि नर्स उभ्या आहेत आणि त्याचे गीत ऐकत आहे. मृत्युशी झुंज देणाऱ्या या तरुणाचं गाणं ऐकून तुमचेही डोळे पाणावतील. या तरुणाने २०२० रोजी जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा : “लोकं बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा पण त्यापेक्षा…” नागपूरच्या तरुणीची पाटी चर्चेत, पाहा Photo

पाहा व्हायरल व्हिडीओ

कोण होता हा तरुण?

या तरुणाचे नाव ऋषभ दत्ता असून तो मुळचा आसामचा होता. त्याला “अप्लास्टिक ॲनिमिया” नावाचा गंभीर आजार होता. ऋषभला वाचवण्यासाठी त्याच्या पालकांनी खूप प्रयत्न केले पण २०२० मध्ये त्याचे निधन झाले. तो उत्तम गायक होता. आजारपणात त्याने गायलेले अनेक गाणे सोशल मीडियावर त्यावेळी व्हायरल झाले होते. त्यातील एक व्हिडीओ सध्या पुन्हा व्हायरल होत आहे.

aapla_jibhau या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” ऋषभ दत्ता मृत्यूपूर्वी हॉस्पिटलच्या बेडवर ‘लग जा गले’ गाणं गात आहे. ऋषभ दत्ता हा आसाम येथील १७ वर्षांचा मुलगा होता. गेल्या काही काळापासून “अप्लास्टिक ॲनिमिया” या गंभीर व दुर्मिळ आजाराने तो ग्रस्त होता. तो खूप चांगला गायक होता आणि हुशार विद्यार्थीही होता. आपल्या एकुलत्या एक मुलाला म्हणजेच ऋषभला वाचवण्यासाठी त्याच्या पालकांनी खूप प्रयत्न केले पण दुर्दैवाने या मुलाचा ८ जुलै २०२० रोजी निधन झाले.

त्याचा स्वभाव अतिशय दयाळू होता. त्याने प्रत्येकाला जगातील गरजू व आजारी व्यक्तीला मदत करण्याची विनंती केली होती. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये त्याला बंगळूरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे bone transplant साठी कुटुंबाला 55 लाखांचा खर्च आला पण महिन्यांच्या उपचारानंतरही तो बरा झाला नाही आणि त्याचे निधन झाले.

हेही वाचा : ‘महाभारत’च्या टायटल गाण्यावर थिरकल्या मुली, डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा

तो खऱ्या अर्थाने एक खूप चांगला गायक होता. त्याने भविष्यात एक गायक बनण्याचं स्वप्नं पाहिलं होतं पण नियतीने त्याच्यासाठी आणखी काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. आता त्याची गाणी जगभर व्हायरल होत आहेत आणि सर्वजण भावूक होत आहे.

ऋषभ जरी आपल्यामध्ये नाही तरी तो कायम आपल्या हृदयात जिवंत आहे. ऋषभ दत्ता तु जिथे कुठे आहे, नेहमी आनंदी राहा.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलेय, ” शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो” तर एका युजरने लिहिलेय, “आवाजात किती दु:ख आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “ज्या पद्धतीने मृत्यूला स्वीकारले, मानलं तुला” एक युजर लिहितो, “मागील पाच वर्षांपासून मी याचे रील बघतो.”