सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करतात तर काही नागरिकांमधील माणुसकीचं दर्शन घडवून आणतात. सध्या अशाच एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी त्या मुलाचं कौतुक करत आहेत. शिवाय जगात अजूनही दयाळूपणा शिल्लक असल्याचं म्हणत आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुमचं मन भारावून जाईल यात शंका नाही. हो कारण, या व्हिडीओत जाळ्यात अडकलेल्या एका कावळ्याला शाळकरी मुलाने जीवदान दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ @itsmesabita नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये, एक लहान शाळकरी मुलगा जाळ्यात अडकलेल्या कावळ्याला मदत करताना दिसत आहे. या मुलाने आपल्या शाळेच्या आवारातील एका भिंतीकडेला जाळ्यात अडकलेल्या कावळ्याला पाहतो आणि त्याला जाळ्यातून सोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.
हेही पाहा- बापरे! चक्क तरुणाच्या दाढीवर मधमाशांची बनवलं पोळं, व्हायरल Video पाहून अंगावर येईल शहारा
काही वेळाने या मुलाच्या प्रयत्नांना यश येतं आणि तो कावळ्याला जाळ्यातून मुक्त करतो. यावेळी तिथे उपस्थित असणारे मित्रांनी आनंद व्यक्त केल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. कावळा उडून गेल्यावर विद्यार्थ्यांनी आनंदाने टाळ्याही वाजवल्या. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “एक दयाळू हृदय असंख्य जीवांना स्पर्श करते.” हा व्हिडीओ आतापर्यंत ४१ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर यावर अनेक नेटकरी वेगवगळ्या प्रतिक्रिया देत व्हिडीओतील मुलाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, “खूप छान! किती विचारी आणि संवेदनशील मूलगा आहे.”