Viral Video : लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. दर दिवशी हजारो लोक लोकलनी प्रवास करतात. सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला पाठीवर दप्तर आणि हातात वह्या पेन घेऊन लोकलच्या दरवाज्यात उभा असलेला दिसत आहे.
तुम्हाला वाटेल, यात काय आश्चर्य.. खरं तर पाठीवर दप्तर असल्यामुळे हा मुलगा शाळकरी वाटत आहे पण त्याच्या हातात असलेल्या वह्या आणि पेन हे विकण्यासाठी आहे. होय. हा चिमुकला लोकलमध्ये वह्यापेन विकतो.
परिस्थिती ही माणसाला सगळं शिकवते, हे तुम्हाला या व्हिडीओतून कळेल. व्हिडीओत असे दिसून येते की कमी वयात या चिमुकल्यावर जबाबदारी आल्यामुळे तो वह्या पेन विकत असावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही पण हा व्हिडीओ मुंबई लोकलमधील असल्याची शक्यता आहे. लोकलच्या दरवाज्यात तो उभा आहे. त्याच्या पाठीवर दप्तर आहे आणि हातात वह्या आणि पेनांचे बॉक्स आहेत. वह्या पेन विकणाऱ्या या चिमुकल्याकडे पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

हेही वाचा : कोळी साडी नेसून रस्त्यावर फोटो शुट करणाऱ्या चिमुकलीवरुन कुणाचीच नजर हटेना, व्हायरल VIDEO एकदा पाहाच

_life_changing_tips या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी या चिमुकल्याला एकदा भेटलो होतो. तो खूप स्पष्ट इंग्रजी बोलतो” तर एका युजरने लिहिलेय, “हा चिमुकला एकदिवस खूप मोठी व्यक्ती बनेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “असे व्हिडीओ पाहिल्यानंतर खरंच डोळ्यात पाणी येतं”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A boy sells books and pen in local train video goes viral responsibility teach everything ndj
Show comments